इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेच्या थराराला प्रारंभ- Advertisement -
तर शनिवारी आठरे पाटील स्कूलचे उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा 2023 चे प्रारंभ झाले असून, अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा थरार रंगला आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून शालेय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
प्रत्येक दिवशी पाच फुटबॉलचे सामने होत असून, अत्यंत चुरशीचे व अटीतटीच्या सामन्यांचा अनुभव फुटबॉल रसिकांना अनुभवयास मिळत आहे. 12, 14 व 16 वर्षे वयोगटातील संघाचे सामने लिग पध्दतीने होत आहे.उद्घाटनानंतर शुक्रवारी 12, 14 व 16 वर्षे वयोगटात आर्मी पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शन करुन प्रतिस्पर्धी ज्ञान संपदा संघांचा धुव्वा उडवून विजय संपादन केले. अनुक्रमे ज्ञान संपदा स्कूलवर 0-2, 0-3 व 0-8 गोलने आर्मी पब्लिक स्कूलने दणदणीत विजय मिळवला.
तर ऑक्झिलियम कॉन्व्हेंट विरुध्द सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट यांच्यात झालेल्या 14 वर्ष वयोगटातील फुटबॉल सामन्यात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटने 1-5 गोलने विजय मिळवला. तर 16 वर्षे वयोगटातील फुटबॉल संघाच्या सामन्यात ऑक्झिलियम कॉन्व्हेंटने 1-2 गोलने सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटवर विजय मिळवला.
शनिवारी (दि.15 जुलै) रोजी झालेल्या अशोकभाऊ फिरोदिया विरुध्द पोदार स्कूलमध्ये फुटबॉलचे सामने झाले. 14 वर्ष आतील फुटबॉल संघात अशोकभाऊ फिरोदियाने 2-3 गोलने विजय संपादन केले. तर 16 वर्षा आतील संघात पोदार स्कूलने 1-3 गोलने अशोकभाऊ फिरोदियावर विजय मिळवला.
आयकॉन पब्लिक स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूलमध्ये झालेल्या फुटबॉल सामन्यांमध्ये 12 वर्षे वयोगटातील संघात 0-4 व 14 वर्षे वयोगटातील संघात 0-5 गोलने आठरे पाटील स्कूलने एकतर्फी विजय मिळवला. तर 16 वर्षे वयोगटातील संघात झालेल्या चुरशीच्या सामन्यात दोन्ही संघांनी 1-1 गोल केल्याने शेवट पर्यंत हा सामना अनिर्णित राहिला.
ही स्पर्धा 14 ते 30 जुलै पर्यंत होणार असून, या स्पर्धेमध्ये 14 शालेय संघांनी सहभाग नोंदविला आहे. 34 सामने या स्पर्धेत खेळले जाणार असून, 22 जुलै पर्यंत फुटबॉल स्पर्धा लीग पद्धतीने होत आहे. त्यापुढील सामने 30 तारखेपर्यंत नॉक आउट पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत ओपन मध्ये पाच मुलींच्या संघांचा देखील सहभाग आहे. स्पर्धेचे पंच म्हणून अभिषेक सोनवणे, सुयोग महागडे, अभय साळवे, प्रभू कुमार, राजेश चव्हाण, सुशील लोट, सिल्व्हास कुमार पाहत आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवाजीयन्स अकॅडमीचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, पल्लवी सैंदाणे, व्हिक्टर जोसेफ, जेव्हीअर स्वामी आदी परिश्रम घेत आहे.