पाथर्डी पोलीस स्टेशन मधील फौजदार व ठाणे आमंलदार राजकीय दबावाखाली गंभीर गुन्ह्याची दखल घेत नसल्याचा आरोप.
न्याय मिळण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट..
गावातील सरपंच गुंडाराज बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी.
अहमदनगर प्रतिनिधी- पाथर्डी येथील वैजूबाभुळगाव येथे झालेल्या घटनेमध्ये एकतर्फा कारवाई करून गावात चाललेल्या सरपंच गुंडाराज मोडून पाथर्डी पोलीस स्टेशन मधील फौजदार व ठाणे आमंलदार राजकीय दबावाखाली गंभीर गुन्ह्याची दखल न घेत असल्याने गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे येऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली.
यावेळी ग्रामस्थ वैशाली घोरपडे, सुवर्णा घोरपडे, पुष्पा घोरपडे, संगीता घनवट, आशाबाई गुंजाळ, सविता फुलशेटे, सोनाली फुलशेटे, नीता पाटोळे, सुभाष घोरपडे, भारत घोरपडे, गणेश फुलशेटे, आबा घोरपडे, दत्ता जरे, रमेश वारे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की बाळासाहेब घोरपडे, नितीन घोरपडे, सुशील घोरपडे हे डाळिंबाच्या झाडावर औषध फवारणी व पाणी देण्यासाठी गावातून जात असताना गावाचे सरपंच ज्योती घोरपडे व त्यांच्या कुटुंबीयातील लोक त्या ठिकाणी गावातील वयोवृद्ध उत्तम तात्या घोरपडे व त्यांची दोन मुले अंबादास व किशोर घोरपडे व त्यांचा पुतण्या गणेश यांच्यामध्ये भांडणे चाली होती. ते भांडण सोडवण्यासाठी रस्त्यावर थांबले असताना संतोष घोरपडे यांनी घरात जाऊन मिरचीची पूड आणली व त्यांच्या सर्वांच्या डोळ्यावर फेकली तसेच घरातून हत्यारे आणून लोखंडी रॉड, कोयता, कुऱ्हाड, दगड, गज, लाकडी दांडके यांने मारहाण केली.
त्यांनी जीवे मारण्याच्या हेतूने ज्ञानेश्वर घोरपडे याला उजव्या बाजूला मानेवर घाव टाकला त्यामध्ये गंभीर जखमी झाले असून सुशील घोरपडे, नितीन घोरपडे, बाळासाहेब घोरपडे, साईनाथ घोरपडे, अंबादास घोरपडे, गणेश घोरपडे, उत्तम घोरपडे यांना जबर मारहाण केली.
सरपंच ज्योती घोरपडे यांच्या सह कुटुंबातील व्यक्तींनी जीवे मारण्याच्या हेतूने मारहाण केलेली आहे. तरी देखील सरपंचांच्या फिर्यादीवरून आमच्यावर 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्हाला देखील तेवढेच मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला असून देखील राजकीय दबाव पोटी आमची फिर्याद अद्यापही घेतलेली नसून कुठलाही गुन्हा दाखल आमच्या बाजूने केलेला नसून गावचे सरपंच असून राजकीय दबावाखाली सदर गुन्हा दाखल होऊ देत नसल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन लवकरात लवकर जखमींचे जबाब घेऊन समोरच्यांवर देखील 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
गावामध्ये सरपंचाचा गुंडाराज चालत असल्याने याला देखील पोलीस यंत्रणेने आळा घालण्याची मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे अन्यथा गावकऱ्यांसमवेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे..