पारनेर (प्रतिनिधी)- येथील छत्रपती कुस्ती संकुलमध्ये तीसरी 23 वर्षा खालील फ्रिस्टाईल व ग्रिकोरोमन मुले व मुली कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेस जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षापासून कुस्ती स्पर्धा थांबल्या होत्या. या स्पर्धेत मल्लांचे रंगतादार कुस्त्यांचे सामने रंगले होते.
नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन करुन कुस्ती स्पर्धेला प्रारंभ करण्यात आले. यावेळी पारनेर तालिम सेवा संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा तालिम संघाचे उपाध्यक्ष पै. युवराज पठारे, नगर तालुका सचिव पै. बाळू भापकर, संभाजी देठे, हनुमंत फंड, बापू होळकर, गोकुळ शिंदे, पोपट गागरे, प्रकाश गाढवे, अनिल ब्राम्हणे, सचिन साठे, पै. गुलाब केदार, पोपट शिंदे आदिंसह खेळाडू उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, कोरोना महामारीमुळे कुस्ती मल्लांना तब्बल दोन वर्ष या संकटाशी झुंज द्यावी लागली आहे. या परिस्थितीमध्ये गावातील यात्रे निमित्त घेण्यात येणारे कुस्ती हगामे व इतर स्पर्धा बंद झाल्या. तालिम देखील बंद होत्या. कुस्ती मल्लांना खुराक, व्यायाम व सरावाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सध्या हळूहळू स्पर्धा सुरु झाल्याने कुस्ती मल्ल सरावाला लागले आहेत. कोरोनामुळे कुस्ती मल्लांचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. पै. युवराज पठारे यांनी कुस्ती स्पर्धा सुरु झाल्या असल्या तरी कोरोनामुळे कुस्ती मल्लांचे झालेले नुकसान भरुन निघणार नाही. कुस्तीची आवड असलेल्या युवकांनी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पहावे. अनेक उत्तम कुस्तीपटू पुढे येत असून, कुस्तीपटूंनी सराव व व्यायाम न थांबविण्याचे त्यांनी आवाहन केले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून पै. हंगेश्वर धायगुडे, पै. संभाजी निकाळजे, पै. गणेश जाधव, पै. किरण मोरे यांनी काम पाहिले. सदर स्पर्धा मॅटवर कोरोनाचे नियम पाळून घेण्यात घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे जिल्हा तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांनी शुभेच्छा दिल्या. सदर विजेते खेळाडू इंदापूर (जि. पुणे) येथे मारकड कुस्ती केंद्रात होणार्या महाराष्ट्र संघाच्या निवडचाचणीसाठी खेळणार आहे. महाराष्ट्र निवड चाचणीत विजयी झालेले खेळाडूंना अमेठी (उत्तरप्रदेश) येथे होणार्या तीसरी 23 वर्षा खालील फ्रिस्टाईल व ग्रिकोरोमन मुले व मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाकडून खेळण्याची संधी मिळणार आहे.