अहमदनगर (प्रतिनिधी)- रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या (रोटरी प्रांत 3132) वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी व इन्टरअॅक्ट क्लबसाठी पोलिओ पासून मुक्ती या विषयावर राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या पोस्टर स्पर्धेला महाराष्ट्रासह इतर राज्यातील विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त सहभाग लाभला. विद्यार्थ्यांनी पोलिओ मुक्तीचे संदेश देणारे विविध चित्र रेखाटून पोलीओ मुक्ती व सशक्त सदृढ भारताचा जागर केला.
विविध राज्यातून 255 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षा शशी झंवर, सचिव देविका रेळे व रोटरी 3132 डिस्ट्रिक्ट पोलिओ प्लस चेअरमन डॉ. बिंदू शिरसाठ यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा पार पडली. लहान गटात अथर्व गवळी (ऑक्झिलीयम कॉन्व्हेंट), कृष्णा गवांदे (महापालिका शाळा नं.23) व मोठ्या गटात रितू शहा (ऑक्झिलीयम स्कूल), ईश्वरी उगळे (आठरे पाटील स्कूल) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत इंद्रप्रस्थ आंतरराष्ट्रीय शाळा (दिल्ली), कुलाची हंसराज मॉडेल स्कूल (दिल्ली), टीओसी पब्लिक स्कूल (केरळ), एसईएस माक्ट्रीक्यूलेशन स्कूल (केरळ), अॅपेक्स ज्युनियर कॉलेज, पीएनपी सायरस पूनावाला स्कूल (अलिबाग), श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल (शिर्डी) तसेच अहमदनगर शहरातील ऑक्झिलीयम कॉन्व्हेंट ज्युनियर कॉलेज, आठरे पाटील पब्लिक स्कूल, जय बजरंग विद्यालय, रेसिडेन्शिअल हायस्कूल, भाऊसाहेब फिरोदिया, सन फार्मा विद्यालय, पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालय, कारमेल कॉन्व्हेंट विद्यालय, जी.जे. चिदंबर विद्यालय आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
वय वर्षे 5 ते 11 (लहान गट) प्रथम- अथर्व गवळी (ऑक्झिलीयम कॉन्व्हेंट), कृष्णा गवांदे (महापालिका शाळा नं.23,) द्वितीय- गीतेश कंत्रोड (ऑक्झिलीयम कॉन्व्हेंट), ऐबल अल्बर्ट (टीओसी पब्लिक स्कूल), तृतीय- अथर्व ससे (ऑक्झिलीयम कॉन्व्हेंट), अर्णव गांडरे (पीएनपी सायरस पूनावाला स्कूल), अक्षरेषा कश्यप (इंद्रप्रस्थ इंटरनॅशनल स्कूल), तसेच वय वर्षे 12 ते 18 (मोठा गट) प्रथम- रितू शहा (ऑक्झिलीयम स्कूल), ईश्वरी उगळे (आठरे पाटील स्कूल), द्वितीय- एन्जल चोपडा (इंद्रप्रस्थ स्कूल, दिल्ली), उत्कर्ष शेटीया (कारमेल कॉन्व्हेंट ), सृष्टी बायस (एसआरईएफ इंग्लिश स्कूल), तृतीय- अंजली माने (सन फार्मा), वैभिका रंजन (इंद्रप्रस्थ इंटरनॅशनल स्कूल), शरण्या पालीवाल (इंद्रप्रस्थ स्कूल), मधू भांडगे (श्री साई बाबा इंग्लिश स्कूल) यांनी बक्षिसे पटकाविली. याव्यतिरिक्त मोठ्या गटाला 15 उत्तेजनार्थ व छोट्या गटाला दोन उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
रोटरी क्लबच्या माध्यमातून पोलिओ निर्मुलनासाठी व्यापक मोहिम राबवून योगदान देण्यात आले आहे. पोलिओ निर्मूलनासाठी उभ्या केलेल्या प्रत्येक डॉलरमागे बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकास दोन प्रमाणात 35 दशलक्ष डॉलरची मदत 2021 या वर्षात करणार आहे. हा निधी वैद्यकीय कर्मचारी, प्रयोगशाळा उपकरणे, आरोग्य कर्मचारी, पालक आणि शैक्षणिक साहित्यासाठी केला जाणार आहे. रोटरीचे सदस्य युनिसेफ आणि इतर भागीदारांबरोबर विविध भागातील तळागाळापर्यंत गरजू घटकांना मदत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिओ संपेपर्यंत नागरिकांना त्याच्या प्रती जागरूक ठेवणे आणि भावी पिढीला लस देऊन सदृढ ठेवण्यासाठी रोटरी प्रयत्नशील असल्याची माहिती रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षा शशी झंवर यांनी दिली.