पोलीस निरिक्षक महेश पाटील यांचे अवैध धंदेवाल्यांबरोबर नवे नाटक
मी मारल्यासारखे करतो, तुम्ही ओरडल्यासारखे करा !
जामखेड (प्रतिनिधी – पोल – खोल – नासीर पठाण )
जामखेड तालुक्यामध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे. दिवसेंदिवस तालुक्यामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक महेश पाटील पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.
महेश पाटील यांची यांच्या सत्य परिस्थितीच्या बातम्या एका दैनिक वृत्तपत्राने प्रसिद्ध केल्या आणि तालुक्यामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी आणि वाढते अवैध धंदे याबाबतची सत्य माहिती जनतेसमोर उजेडात आणली आणि मग पोलीस निरिक्षक महेश पाटील यांना तालुक्यातील धंदे बंद आहेत असे जनतेला दाखविणे गरजेचे झाले. पण खरोखरच सर्व अवैध धंदे बंद केले तर मग या सर्वाच्या ‘हप्त्या’ पासून मिळणारे एवढे प्रचंड उत्पन्न बंद होणार ! त्यामुळे महेश पाटील यांनी अवैध धंदेवाल्यांबरोबर एक नवे नाटक सुरू केले आहे. अवैध धंदेवाल्यांना फक्त दमदाटी करायची, त्याला धंदा बंद कर असे सांगायचे आणि पुन्हा आतून त्याला गुपचुप चालू ठेव असे पण सांगायचे. म्हणजेच महेश पाटील यांनी अवैध धंदेवाल्यांना मारल्यासारखे करत आहेत आणि अवैध धंदेवाले ओरडल्यासारखे करीत आहेत.
मटका, जुगाराचे क्लब आणि बाजारच्या दिवशी झटपट मटका या अवैध धंद्यांना जामखेडमध्ये नुसता उत आलेला आहे आणि हे सर्व धंदे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना चोरून लपून का होईना जिवंत ठेवायचे आहेत. अवैध धंदे बंद
झाले तर मग ‘हप्ता’ बंद होईल, मग एवढी शक्ती पणाला लावून आपण आपली बदली जामखेड पोलिस स्टेशनला करवून घेतली आहे, मग त्याचा उपयोग काय? महेश पाटील साहेबांनी अवैध धंदे आणि गुन्हेगारी यावर नियंत्रण आणायचं सोडून बाजारपेठेतील व्यापारी, हॉटेलवाले, पानटपरीवाले यांनाच कायद्याचा बडगा दाखवून त्रास द्यायला सुरुवात केली महेश पाटलांच काही चाललं नाही.
जिल्हा पोलिस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे बंद आहेत, अशी ग्वाही दिली आहे. परंतु जामखेडमध्ये मात्र सर्व अवैध धंदे महेश पाटील यांच्या आशीर्वादाने बिदिक्कत चालू आहेत .
वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे त्यांची येथून उचलबांगडी केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही. त्यामुळे त्यांची तातडीने येथून बदली करण्याची मागणी जामखेडकरांच्या तोंडातून चर्चेली जात आहे .