योगदिनानिमित्त कर्मयोगी योग स्टुडिओच्या वतीने घेण्यात आलेल्या योगामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रथमच नागरिकांनी घेतला हिमालयीन सिंगिंग बाऊल व साऊंड हीलींगची अनुभूती
योग हे समृद्ध जीवन जगण्याची गुरुकिल्ली – गायत्री गारडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- योग दिनानिमित्त अहमदनगर मध्ये कर्मयोगी योग स्टुडिओच्या वतीने एक आगळा वेगळा नागरिकांसाठी मोफत उपक्रम राबविण्यात आला असून कर्मयोगी योग स्टुडिओच्या वतीने कर्मयोगोत्सव- दोन चे आयोजन तपोवन रोडवरील श्रेयस लॉन्स येथे करण्यात आले. यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
या उत्सवात प्रसिद्ध योगगुरू गायत्री गारडे यांनी योगाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट म्हणजे नगर मध्ये प्रथमच हिमालयीन सिंगिंग बाऊल्स चा परिचय व साऊंड हिलिंग ची अनुभूती नागरिकांना अनुभवण्यास मिळाली आहे, पुणे येथील सायली राऊत ग्लोबल मेडिकल योगा थेरपी व सुप्रसिद्ध डाएटिशियन नुट्रिशनीस सौ.ज्योती येणारे यांनी आहारविषयक व योगासन व प्राणायाम विषयी मार्गदर्शन केले.
तसेच कर्मयोगी योग स्टुडिओच्या प्रसिद्ध योग गुरु गायत्री गारडे म्हणाल्या की, योगा हे शरीर मन आत्मा आणि विश्व एकत्र करते योगा ही समृद्ध जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे मन आणि शरीरावर चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी व निरोगी आरोग्यासाठी जगभरात योग नित्य नियमाने केला जात असल्याचे प्रतिपादन केले व योग ही एक कला आहे योग एक शस्त्र आहे योग मुख्यत्वे प्राणायाम द्वारे शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रयुक्त आहे अनेक आजारावर मात करण्यासाठी योगासन खूप महत्त्वपूर्ण ठरत आहे नियमितपणे योग व प्राणायामाने निरोगी जीवन जगता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. व शेवटी कार्यक्रमात योगिक गेम्स घेण्यात आले व विजेत्यांना हेल्थ केअर हॅम्पर डॉ. नेहा शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.