कायनेटिक चौकात अरिहंत ट्रेडर्सच्या मिरॅकल इलेक्ट्रिक बाईक शोरुमचे उद्घाटन
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रदुषणमुक्ती व पेट्रोल वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक बाईक काळाची गरज बनली आहे.राज्य व केंद्र सरकार देखील या वाहन उत्पादनांसाठी प्रोत्साहन देत आहे.इलेक्ट्रिक बाईकच्या वापराने दररोजचा मोठ्या प्रमाणात होत असलेला पेट्रोलचा खर्च वाचणार असल्याचे प्रतिपादन अनिल मेहेर यांनी केले.
नगर-दौंड महामार्गावरील कायनेटिक चौकात अरिहंत ट्रेडर्सच्या मिरॅकल इलेक्ट्रिक बाईकच्या शोरुमचे उद्घाटन उद्योजक सतीश मेहेर यांच्या हस्ते झाले.यावेळी इलेक्ट्रिक बाईकची माहिती देताना शोरुमचे संचालक अनिल मेहेर बोलत होते.
यावेळी दिलीप मेहेर, नयन मेहेर, श्रेणीक मेहेर, विपुल शेटीया, प्रशांत मुथा, मनसुखलाल सुरपुरीया, कासार मामा, अरुण म्हस्के, निरज लुणिया, रुपल लुणिया, केतन कोठारी, निलेश पटवा, सुनिल चोरडिया आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मेहेर म्हणाले की,धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला वाहनाची गरज भासत आहे.मात्र वाहनांमुळे होणारे प्रदुषण थांबण्यासाठी इलेक्ट्रिक बाईक सर्वोत्तम पर्याय आहे.तर महागाई वाढत असतान पेट्रोलचे दर गगनाला भिडत आहे.अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य वर्गाला परवडणारी इलेक्ट्रिक बाईकला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अत्यंत कमी मेन्टेनन्स असलेल्या इलेक्ट्रिक बाईक विविध रंगात व आकर्षक लुक मध्ये उपलब्ध आहे.बॅटरी गाडीला ५० कि.मी. साठी ५ रुपये अत्यल्प खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले.