नगर – प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून शेतकर्यांना शेतीसाठी लागणारी खते, बी-बियाणे, औषधे, अवजारे एकाच छताखाली उपलब्ध झाली आहेत.देशाचे प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या केंद्रांचा आज देशभरात शुभारंभ करण्यात झाला आहे.
त्यामुळे शेतकर्यांना शेतीच्या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही.एकाच ठिकाणी सर्वच सुविधा मिळणार असल्याने वेळेची बचत,पैसा आणि परिश्रम वाचणार आहे.केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकर्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत.त्या माध्यमातून शेतकर्यांना मोठा फायदा होत आहे.
प्रत्येक वर्षी शेतकर्यांच्या खात्यात रुपये सहा हजार जमा होतात तर राज्यातील भाजप सेनेच्या सरकारच्या माध्यमातूनही प्रत्येकवर्षी सहा हजार जमा होत असल्याने शेतकर्यांचे जीवनमान उंचवले आहे. त्याचबरोबर शेतकर्यांच्या मालाला रास्त भाव, बाजार समितीच्यांचे आधुनिकीकरण, ऑनलाईन बाजारभाव, शेतकर्यांसाठी अॅप अशा अनेक योजनांचा शेतकर्यांना फायदा होऊन त्यांचे जीवनमान उंचविले जात आहे, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी केले.
प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधून शेतकर्यांशी संवाद साधला. नगर शहर भाजपाच्यावतीने मार्केट यार्ड येथे कार्यक्रमप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर, प्रदेश सचिव तथा शहरप्रभारी नवनाथ पडळकर, विधानसभा प्रमुख भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अॅड.विवेक नाईक, सुवेेंद्र गांधी, महेश नामदे, तुषार पोटे, नगरसेवक रविंद्र बारस्कर, उदय कराळे, सतीश शिंदे, प्रदीप परदेशी, संजय ढोणे, अजय चितळे, पंकज जहागिदार, वसंत राठोड, शिवाजी दहिंडे, पिटू बोरा, राजेंद्र सातपुते, नितीन शेलार, मयुर बोचूघोळ, पंडित वाघमारे, संतोष गांधी, संपत नलावडे, विशाल खैरे, सुरेश लालबागे, अंबादास पुंड, अशोक गायकवाड, बाबासाहेब सानप, बाळासाहेब गायकवाड, अदित्य देशपांडे, अमित गटणे, सुजय मोहिते, सुहास पाथरकर, प्रताप पदेशी, अजय ढोणे, अमोल निस्ताने, शिवाजी मोरे, प्रशांत गहिले, सुजित कोके, दिपक देहेरेकर, महेश पवार, हिरामन कोतकर, सौरभ भुजबळ, शाहू होले, गोपाळ वर्मा, मंगेश खगले, मंडल कृषी अधिकारी श्रीमती रावळ आदि उपस्थित होते.
यावेळी नवनाथ पडळकर म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने शेतकर्यांचे हित जोपासण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आहे. आपला देश हा शेतीप्रधान असल्याने शेतकर्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी विविध योजना केंद्र सरकारने सुरु केल्या आहेत. शेतमालाचे उत्पादन वाढविण्याबरोबर परदेशी बाजारपेठाही उपलब्ध होत असल्याने शेतकर्यांना चांगला भाव मिळत आहे.आज शुभारंभ होत असलेल्या किसान समृद्धी केंद्रामुळे शेतकर्यांना एकाच छताखाली शेती विषयक साधने उपलब्ध होणार असल्याने त्यांचा लाभ नक्कीच शेतकर्यांना मिळेल, असे सांगितले.
याप्रसंगी भैय्या गंधे, बाबासाहेब वाकळे, बाबासाहेब सानप, सुवेंद्र गांधी आदिंनीही मनोगतातून पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या समृद्धी किसान केंद्रबद्दल सरकारचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार पोटे यांनी केले तर आभार अजय चितळे यांनी मानले.कार्यक्रमास नगर शहरातील शेतकरी कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.