प्री वेडिंग फोटोग्राफीसाठी साईबनला पसंती

- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – महेश कांबळे

लग्नाआधी प्री वेडिंग फोटोग्राफी किंवा व्हिडीओग्राफी करण्याचा कल दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच मॉडेलिंग फोटोशूटची क्रेझ वाढत आहे यासाठी आकर्षक इमारती,घरे,समुद्रकिनारे,डोंगरदऱ्या,हिरवळ अशी अनेक ठिकाणे निवडली जातात.लोकांचा वाढता ओघ लक्षात घेता पुणे-मुबईतील काहीनी सगळी लोकेशन एकाच ठिकाणी उभारून आपल्या फार्महाऊसचे रूपांतर अशा लोकेशनमध्ये केले आहे.

परंतु नगरमधील एमआयडीसीच्या मागे असणार्या साईबन कृषी पर्यटन केंद्रात हे सर्व लोकेशन नैसर्गिक पद्धतीने आहेत त्यामुळे फोटोग्राफर व इच्छुक लोक फोटोग्राफी साठी साईबनला पसंती देत आहेत.

गेली अनेक वर्षे समुद्री किनारी,कोकण,किल्ले आदी ठिकाणी जाणारी मंडळी आता नगरमध्ये फाटोशूट करत आहेत इतर ठिकाणच्या मानाने आर्थिक दृष्ट्या अल्पखर्च नगरमध्ये येत आहे.नगरजववळील अनेक ऐतिहासिक वास्तूच्या  ठिकानाबरोबर साईबन मध्ये २ दिवस असे फोटोशूट लोक करत आहेत याठिकाणी प्रवेश शुल्क सोडून इतर कोणतेही शुल्क आकारले जात नाही त्यामुळे अल्प खर्च व वेळ हि वाचतो.

साईबन सर्व ऋतूत आकर्षक दिसतो तीनही ऋतूत या ठिकाणी लोकेशन चांगले असते या कृषी पर्यटन केंद्रमध्ये तलाव,बोटिंग,सर्व परिसर हिरवागार,डोंगर,प्राणीशिल्प, ठिबकसिंचन द्वारे उडणारे पाणी,उत्कृष्ट प्रकाश,सनसेट, मोठा परिसर,ड्रेस चेंजिंग रूम,अल्प दरात जेवणाची सोय,वेवेगळी वाहने याबरोबर बैलगाडी सफर,धबधबे व कारंजे,प्राणी व पक्षी,नभोजन,रवींंद्र कलानिकेतन व हिरवळीवरील खुले नाट्यगृह,घसरगुंड्या,झोके, जंगलजीम,ट्रेकींग,बर्डपार्क,मेडिटेशन टेकडी,रोपवाटिका, बोटॅनिकल गार्डन,हरितगृह,फुलशेती,व्हर्मीकंपोस्ट प्रकल्प, अपांरपारिक उर्जाप्रकल्प,पक्षीउद्यान,स्ट्रॉबेरी व ढोबळ्या रंगीत मिरच्यांची शेती,नौकाविहार,पपेट व कटपुतली शो आदी ठिकाणी फोटो व व्हिडिओशूट केले जाते.

लग्न म्हटले की,गोड आठवणींचा सोहळाच असतो.हाच सोहळा आठवणीच्या स्वरुपात जपण्यासाठी कॅमेर्‍यात कैद केला जातो.परंतु हल्लीच्या जमाना फास्ट झाल्याने लग्नापूर्वीच्या आठवणीदेखील कॅमेर्‍यात बंदिस्त करण्यासाठी नवा पर्याय निवडला जात आहे.तो म्हणजे प्री-वेडिंग शूट होय.

सध्या विवाह सोहळा एका विधीपुरता मर्यादित न राहता,लग्नाच्या आधीच्या क्षणांचा आनंद साठवून ठेवण्याकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे.भावी वधू-वराच्या पहिल्या भेटीपासून ते एकमेकांच्या विवाह सोहळ्यापर्यंतचे सर्व क्षण पुन्हा अनुभवून साठवण्यासाठी प्री-वेडिंग फोटो शूट केले जात आहे.

म्हणजेच लग्न ठरल्यावर दोघे पहिल्यांदा कधी भेटले,कुठे भेटले,लग्नासाठी कुणी पहिल्यांदा विचारले?यासारख्या आठवणी कॅमेर्‍यात साठवल्या जात आहेत.त्यामुळे पहिल्या भेटीपासून ते लग्न ठरण्यापर्यंतचा प्रवास कॅमेर्‍यामध्ये बंदिस्त करण्याचा पर्याय तरुणाईने निवडला आहे.यासाठी प्री-वेडिंग शूट करणार्‍या फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्सना मोठी मागणी वाढली आहे.

पूर्वीच्या काळी लग्न होईपर्यंत नव्हे लग्नानंतरही कित्येक दिवस नवरा-नवरी बोलायची नाहीत.परंतु आताची तरुणाई यापुढे जात आयुष्यातील महत्त्वाच्या सोहळ्याला कॅमेर्‍यात बंदिस्त करताना दिसत आहे.गेल्या काही वर्षात प्री-वेडिंग शूटला फार मागणी आली आहे.

प्री-वेडिंग शूटवेळी फोटो फ्रेम्स,फुगे,छत्री,बाईक, सायकल,गाडी तसेच लग्नाची तारीख लिहिलेल्या पाट्या असे विविध प्रॉप्स वापरले जातात.फोटो काढत असताना त्याचे चित्रीकरणही केले जाते.ज्याचे रूपांतरप्री-वेडिंग व्हिडिओमध्ये होते.या माध्यमातून जोडपे एकमेकांना अधिक ओळखते,असे सांगितले जाते.

लग्नाआधीची शूटिंग ज्यांना एकत्रिततेची चांगली चित्रे हवी आहेत त्यांच्यासाठी आहेत,जड लग्नाच्या पोशाख, मेकअप,दागिने,आजूबाजूची लोकांची संख्या आणि त्रासदायक सेल्फीच्या त्रासांशिवाय.लग्नाआधीची फोटोग्राफी दोन्ही भागीदारांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखू देते.

आपण पोझ देण्यास किंवा न देण्यास मोकळे असतो,प्री-वेडिंग शूट हे आपल्या आणि आपल्या फोटोग्राफरमध्ये एक संबंध तयार करण्यास मदत करते म्हणून नगर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातील लोक व फोटोग्राफर साईबन पसंती देत आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles