सौरभ चौरे याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणेबाबत.
अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर महानगरपालिकेने शिरिष एन लोढा, पुणे या संस्थेला शहरामध्ये विविध ठिकाणी बी.ओ.टी. तत्वावर गॅन्ट्री (दिशादर्शक फलक) बसविण्याचे काम १० वर्षाकरीता दिलेले आहे.सदरील संस्थेने २१ ठिकाणांपैकी सध्या ४ ठिकाणी सदरील कमानी उभारण्यात आलेल्या आहेत.या कमानीवर सदरील संस्थेने रस्त्याचे दिशादर्शक फलक व उत्पन्नासाठी जाहिरात फलक लावण्यास परवानगी दिलेली आहे.
गुरुवार दिनांक २५/११/२०२१ रोजी प्रोफेसर कॉलनी चौक या ठिकाणी सौरभ सुरेश चौरे वय २२, रा. नालेगाव हा युवक फलेक्स बोर्ड लोखंडी कमानीला लावीत असतांना विजेचा धक्का बसुन त्याचा दुदेवी मृत्यु झालेला आहे.
सदरील युवक कमी वयाचा असून या दुर्घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झालेला आहे. महानगरपालिकेच्या अटी,शर्तीनुसार जाहिरात लावतांना प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करणे आवश्यक आहे.जेणेकरुन जिवितहाणी होणार नाही तसेच जिवितहाणी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सदरील संस्थेची आहे.
शहरात उभारलेल्या कमानी या विद्युत पोल अथवा विद्युत तारा जवळ उभारतांना दक्षता तसेच दुर्घटना घडणार नाहीत अशा सुरक्षित अंतरावर सदरील कमानी उभारणे गरजेचे होते.प्रोफेसर कॉलनी या ठिकाणी उभारलेल्या कमानीजवळ विद्युत तारा आहेत.या विद्युत तारांमध्ये प्लॅस्टिकचा पाईप व सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे होते.
सदरील संस्थेने ही काळजी न घेतल्यामुळे व हलगर्जीपणामुळे या मुलाचा मृत्यु झालेला आहे.सदरील मुलाच्या कुटूंबियांना महानगरपालिकेने सदरील संस्थेवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळवून देणे आवश्यक आहे.
तसेच यापुढे शहरामध्ये लावण्यात आलेल्या मॅन्ट्री (दिशादर्शक फलक)अशी दुर्घटना घडणार नाही याबाबत पाहणी करुन सुरक्षित उपाययोजना करण्यात याव्यात.तरी प्रोफेसर कॉलनी चौक येथे गेंन्ट्री (दिशादर्शक फलक)वरती फ्लेक्स बोर्ड लावतांना विजेचा धक्का बसून झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येवून संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात यावी.
तसंच सदरील संस्थेकडून सदरील मुलाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून द्यावी,अशी मागणी अहमदनगर महानगरपालिकेचे उपमहापौर गणेश भोसले यांनी केली आहे सदर मागणीचे पत्र आयुक्त शंकर गोरे यांना त्यांनी दिले.