राज्याचे माजी महसूलमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात,आमदार.डॉ.सुधीर तांबे,यांचे अहमदनगर जिल्हा मधून काँग्रेसचे अत्यंत विश्वासू व एकनिष्ठ असलेले बंटीभाऊ यादव यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाच्या ‘प्रदेश महासचिव पदी’ निवड….
नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थभाऊ हत्तीअंबिरे यांनी कार्यकारणी जाहीर केले
त्यामध्ये प्रामुख्याने अमदनगर जिल्ह्यांमधून आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे काँग्रेस मध्ये काम करणारे व काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम करणारे बंटी भाऊ यादव यांची दुसऱ्यांदा प्रदेश कमिटीवर महासचिव पदी घेऊन काम करण्याची संधी व जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी दिलेली आहे.
यावेळी त्यांच्या निवडीला उत्तर देताना यादव म्हणाले की माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब व डॉ.सुधीर तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष वाढीसाठी तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये जोडण्याचं काम अत्यंत प्रामाणिक व निष्ठेने करील असे यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी त्यांच्या निवडीचे अभिनंदन, युवकांचे नेते,सत्यजित दादा तांबे,सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक. इंद्रजितभाऊ थोरात,डॉ.जयश्रीताई थोरात,विद्यार्थी सेनेचे सचिनजी साळवे,प्रदेश कॉंग्रेसचे माजी समन्वयक शिवाजीराव जगताप,अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्रजी वाघमारे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष कार्लोस साठे सर, सोशल मीडिया उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सचिनजी बोर्डे,नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे,जिल्हा उपाध्यक्ष उमेश शेजवळ, कोपरगाव काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल, मनोज बिडवे,नगर कॉग्रेसचे गणेश ढोबळे सुभाष तोरणे,आदिनी अभिनंदन केले.