बहुजन समाज पार्टीच्या वतीने उमाशंकर यादव यांचा उमेदवारी अर्ज दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी उमाशंकर यादव यांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि.25 एप्रिल) दाखल केला.
पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह यादव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपुर्द केला. यावेळी जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, ज्येष्ठ नेते सलीमभाई अत्तार, जिल्हा सचिव सुभाष साबळे, पक्षाचे दक्षिण लोकसभा अध्यक्ष शशिकांत नवगिरे, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, महिला शहराध्यक्ष मनीषा जाधव, माजी शहराध्यक्ष प्रतीक जाधव, संतोष मोरे, गणेश बागल, जवाहर पठारे, शंकर वंजारे, राहुरी विधानसभा अध्यक्ष संजय संसारे, राहुरी शहराध्यक्ष रवी भालेराव, कोळगे, मनतोडे आदी उपस्थित होते.
उमाशंकर यादव पक्षाचे जिल्हाध्यक्ष असून, त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन नुकतीच त्यांना पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाली होती. उमाशंकर यादव म्हणाले की, बहुजन समाज पार्टीत सर्वसामान्यांच्या हातात नेतृत्व देण्याचे काम केले जात आहे. एका कंपनीतील कामगारांना पक्षाने उमेदवारी देऊन त्याच्या कार्यादी दखल घेतली आहे.
इतर पक्षात घराणेशाही सुरु असून, सर्वसामान्यांना संधी दिली जात नाही. प्रस्थापितांविरोधात बसपा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. जिल्ह्यात सत्ताधारी व विरोधक फक्त राजकारणात मश्गुल असल्याने त्यांना युवकांचा रोजगार, महिलांचे प्रश्न व इतर समस्या सोडविण्यात आलेल्या नाहीत. जिल्ह्यातील युवक आजही कामानिमित्त व शिक्षणासाठी मोठ्या शहरात जात आहे.
जिल्ह्यातील नेत्यांनी फक्त स्वत:च्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. मात्र सर्वसामान्यांच्या शिक्षणाची जाणीव त्यांना नाही. ही निवडणुक फक्त खोट्या घोषणा करुन मतदारांची फसवणुक करणाऱ्यांविरोधात पर्याय म्हणून उमेदवारी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर भविष्यात जिल्ह्याच्या दृष्टीकोनाने उद्योगधंदे, युवकांचा रोजगार, महिलांचे प्रश्न व शिक्षणाच्या सोयी-सुविधांसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- Advertisement -