प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास: नगरसेवक कुमार सिंह वाकळे
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
बोल्हेगाव नागापूर परिसर हा ग्रामपंचायत मधून मनपा हद्दीत आला आहे.तळ्या माळ्याचा हा ग्रामीण भाग असल्यामुळे मूलभूत सुविधांपासून विकास कामे सुरू करावी लागली आहे.
आमदार संग्राम जगताप व मनपाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्यामुळे नागरी वसाहती वाढत आहे. या भागाला विकास कामातून शहरीकरणाचे रूप निर्माण करून देण्याचे काम केले आहे.
विकासाच्या सर्व योजना प्रभाग क्रमांक ७ मध्ये घेऊन जाण्याचे काम करत आहोत. सध्या शहरामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सुरू असलेले सुरू स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या काम बोल्हेगाव परिसरात सुरु केले आहे.
लवकरच सर्व भागांमध्ये पथदिवे बसवली जातील व प्रभाग क्रमांक ७ प्रकाशमय होहील. प्रभागाचा सर्वांगिन विकास हाच माझा ध्यास आहे.तो पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन नगरसेवक कुमार सिंह वाकळे यांनी केले.
प्रभाग क्रमांक ७ मधील बोल्हेगाव गावठाण परिसरामध्ये स्मार्ट एलईडी पथदिवे बसवण्याच्या पाहणी करताना नगरसेवक कुमार सिंह वाकळे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.