बोल्हेगाव चिंतामणी कॉलनी येथे तीव्र पाणी टंचाई , नागरिक त्रस्त- Advertisement -
आठवड्यातून एकदा तरी नळाद्वारे पिण्याचे पाणी द्या – नागरिकांची आयुक्तांकडे मागणी
नगर : बोल्हेगाव चिंतामणी कॉलनी परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरिक तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहे, नागरिकांना चार ते पाच किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागते, त्यामुळे विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे, या परिसरामध्ये बोरवेलला खारे पाणी असून ते वापरासाठी योग्य नाही त्या पाण्यामुळे नागरिकांना त्वचेचे आजार झाले आहेत, चिंतामणी कॉलनी परिसरामध्ये फेज टू पाणी योजनेचे पाईप टाकून झाले आहे तरी आम्हाला आठवड्यातून एकदा तरी नळाद्वारे पिण्याचे पाणी द्या, अशी मागणी नागरिकांनी मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी केली आहे
बोल्हेगाव चिंतामणी कॉलनी परिसरामध्ये तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी मिळावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत व माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त पंकज जावळे यांना निवेदन दिले यावेळी गणेश कुलट, सुनील लोमटे, नाना वाळके, शेखर खाकाळ, विजय साळवे, अशोक चौधरी, अमोल चौधरी, विजय रावस, युनुस शेख, तात्या गायकवाड, भागचंद चव्हाण, संजय सोनवणे, संजय मरकड, अविनाश सोळसे, सदाशिव कुलकर्णी, प्रशांत बनकर, माणिक कांबळे, प्रदीप थोरात, शंकर राजगुरू, उदयसिंग वाणी, प्रवीण जऱ्हाड, रोहन नेटके, मीना कांबळे, मीरा लोमटे, ठकुबाई महाजन, रोहन पिसे, शशिकांत गवारी, तुकाराम पवार, दीपक बराटे, अशोक टकले, तुषार ठोंबळ, विकास गाडे, निलेश चांदणे, प्रदीप दहातोंडे, महेश दळवी आदी उपस्थित होते.
चौकट : बोल्हेगाव चिंतामणी कॉलनी परिसर या भागामध्ये पाण्याच्या लाईन टाकून झाल्या आहेत आणि आता याला फक्त पाणी चालू करणं अपेक्षित आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून नियोजन करणे गरजेचे असून लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा आ.संग्राम जगताप यांनी दिला
चौकट : बोल्हेगाव चिंतामणी कॉलनी परिसरात मोठी लोकवस्ती निर्माण झाली असून नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे, मनपाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही पाणी प्रश्न मार्गी लागला नाही त्यामुळे आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत नागरिकांसमवेत मनपा आयुक्त यांची भेट घेत पाणी समस्या सोडवण्याची मागणी केली असे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी सांगितले
चौकट : मुळा धरणातील पाणी साठा अत्यंत कमी होत चालला असून २० टक्के कपात करण्याच्या सूचना मनपाला प्राप्त झाल्या आहे याचबरोबर मुळा धरणात तळाशी असलेला चौथा पंपही सुरु करण्यात आला आहे, तरी नविन नळ कनेक्शन दिले जात नाही, तरी देखील नियोजन करून या भागाला लवकरच पाणी पुरवठा केला जाईल आणि मुळा धरणातील पाणी साठा वाढल्यानंतर नियमित पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी दिले.