कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत येथे राज्याचे माजी जलसंधारण मंत्री व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन,नगर दक्षिण चे खासदार डॉ.सुजय विखे पाटील व जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या हस्ते झाले.यावेळी जोरदार पावसाने हजेरी लावली,भर पावसामध्ये ही जाहीर सभा झाली आणि हीच खरी विजय सभा होणार असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी यावेळी बोलताना जाहीर केले.
माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत येथे जनसंपर्क कार्यालय सुरू केले असून यावेळी माजी मंत्री राम शिंदे, खा.सुजय विखे पाटील व जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,ज्येष्ठ नेते शांतीलाल कोपनर,अल्लाउद्दीन काझी, ॲड शिवाजी अनभुले,विजय तोरडमल,भगवान मुरूमकर,सचिन पोटरे काकासाहेब धांडे,विनोद दळवी अनिल गदादे,वैभव शहा,गणेश शिरसागर,सुनील यादव,ज्ञानदेव लष्कर, रावसाहेब खराडे,नंदलाल काळदाते,संजय भैलुमे,दत्ता कदम,अंकुश दळवी,राजेंद्र येवले,माया दळवी नीता कचरे राखी शहा मनीषा वडे डॉ कांचन खेत्रे,शेखर खरमारे, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
या कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली अखेर पडत्या पावसामध्ये भाजपच्या नेत्यांनी बाजारतळ येथे जाहीर सभा घेतली,सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खा शरद पवार यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या प्रचार सभेचे आठवण यावेळी खासदार विखे यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितली,वैद्य सवयी प्रमाणेच आजची ही सभा होत असून आगामी होणाऱ्या कर्जत नगरपंचायत च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा देखील विजयाची नांदी होणार आहे असे विखे यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजना व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी मंजूर केलेल्या नगर करमाळा व श्रीगोंदा जामखेड या रस्त्यांचा कामाचा पुनरुच्चार करत आम्ही केलेल्या कामाचे श्रेय रोहित पवार घेत असल्याबद्दल त्यांच्यावर प्रखर टीका केली.
कर्जत जामखेड मतदार संघातील २८ हजार लग्नाळू मुलांपैकी किती जणांचे लग्न आमदार रोहित पवार यांनी लावून दिले,तसेच सात हजार सुशिक्षित बेरोजगार युवकां पैकी किती युवकांना नोकर्या दिल्या,अशी टीका राज्याचे माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर कर्जत येथे बोलताना केली.सुरुवातीला भाषण न करण्याचे जाहीर करून नंतर पडणाऱ्या पावसा मध्ये खासदार विखे यांनी सातारा येथील सेवेची आठवण करून दिल्यावर राम शिंदे यांनी देखील भर पावसात जोरदार भाषण ठोकले.
यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.२८ हजार युवकांना लग्नाचे आमिष दाखवून यांनी मते घेतली मात्र आजपर्यंत एकाही युवकाचे लग्न झाले नाही तसेच ७००० सुशिक्षित बेरोजगारांचा मेळावा घेतला मात्र त्यापैकी एकाही युवकाला यांनी नोकरी लावली नाही.
कर्जत जामखेड मतदार संघातील युवक हा त्यांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडला त्यांना वाटले यांचा आजोबा चुलता हे मोठ्या पदावर आहेत त्यामुळे नक्कीच आपल्याला नोकरी लागेल परंतु आता सर्वांच्या भ्रमनिरास झाला आहे असे राम शिंदे यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे काकासाहेब धांडे अनिल गदादे यांची भाषणे झाली प्रस्ताविक सचिन पोटरे यांनी केले.
माजी मंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमास खासदार विखे यांचे कट्टर समर्थक व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ याच प्रमाणे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर हे अनुपस्थित राहिल्यामुळे त्याची जोरदार चर्चा मतदारसंघांमध्ये कार्यक्रमानंतर सुरू झाली आहे.राम शिंदे यांनी अंबादास पिसाळ यांना तर कर्जत येथील भाजपच्या टीमचे कॅप्टन जाहीर केले होते..