महानगर जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत पाटोळे यांची निवड
नगर – भाजपप्रणित केंद्रातील मा.नरेंद्र मोदी सरकारच्यावतीने सर्वसामान्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. या योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करावयाचे आहे. त्याचबरोबर पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्यातील आघाडी सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर गंभीर नसून, कोरोनासह इतर अनेक गोष्टींमध्ये हे सरकार अपयशी ठरले आहे. या सरकार विरोधात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठविला पाहिजे. आज नूतन पदाधिकार्यांची निवड करुन विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे, या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविचे काम करावयाचे आहे, त्यासाठी वरिष्ठ पातळीवर आपणास सर्वोतोपरि सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिक निकाळजे यांनी केले.
भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत पाटोळे यांना नियुक्तीचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिक निकाळजे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव मनेष साठे आदि उपस्थित होते.
भैय्या गंधे म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. केंद्रातील भाजपप्रणित सरकारच्या विविध योजनांचा सर्वसामान्यांना लाभ होत आहे. त्यामुळे पक्षामध्ये सामिल होण्यासाठी युवकांचा ओढा वाढत आहे. या युवकांना दिशा देण्याचे काम केले जाईल. नूतन पदाधिकार्यांनी पक्ष वाढविण्यासाठी विविध शिबीराच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण शिबीराचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी चंद्रकांत पाटोळे म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे नगरमध्ये चांगले नेटवर्क निर्माण झाले आहे. भाजपाच्या विविध आघाड्या, मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवून पक्ष संघटन मजूबत करण्यात येत आहे. अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्ते पक्षाचे संघटन चांगल्या पद्धतीने करत आहे. या युवकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ताकद देण्यासाठी विविध पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्या माध्यमातून पक्ष संघटना वाढविण्यात येईल, असे सांगितले.
नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे : जिल्हाध्यक्ष – चंद्रकांत पाटोळे. उपाध्यक्ष – अॅड.अभिजित अडागळे, विशाल साठे, संतोष शिरसाट, आदेश भिंगारदिवे, रविंद्र बोर्डे. सरचिटणीस – अॅड.किरण भिंगारदिवे, दिपक उमाप, राजेंद्र घोरपडे, सचिव भाऊसाहेब बुलाखे, नितीन चाबुकस्वार, संतोष पाटोळे, दावीत गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, कोषाध्यक्ष- ऋषिकेश देठे, प्रसिद्धीप्रमुख – विठ्ठल शिरसाट, सोशल मिडिया प्रमुख – सुरेश सकट, सहप्रमुख- राहुल भिंगारदिवे, सदस्य – शाम वाघमारे, निमंत्रित सदस्य – मनेष साठे, किसनराव भिंगारदिवे आदिंसह अनुसूचित जातीच्या प्रदेश सचिवपदी मनेष साठे यांची निवड करुन मान्यवरांच्या हस्ते पत्र देण्यात आले. या नूतन पदाधिकार्यांचे पक्षाच्या वरिष्ठांसह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.