भाजपाच्यावतीने मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी श्री विशाल गणेश मंदिरासमोर आरती

- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – राज्य सरकाराने गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्योग, व्यवसायांबरोबरच मंदिर उघडण्यावर बंदी घातली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतांना जवळजवळ सर्वच क्षेत्रावरील निर्बंध उठवून सर्व व्यवस्थीतरित्या सुरु केले. विशेषत: बार ही सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली मात्र मंदिरे बंद ठेवले आहेत. जो देव मनुष्यावर संकट आल्यावर धावून येतो, त्याच देवाला कोंडून ठेवण्याचे पाप हे सरकार करत आहे. आता सर्वत्र पुर्ववत परिस्थिती होत असतांना मंदिरे बंद ठेवून शासन भाविकांच्या धार्मिक भावनांशी खेळत आहे. मंदिरासारख्या पवित्र व आपणास प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देणारी ही शक्ती स्थळे बंद ठेवून सरकार काय सिद्ध करत आहे हा मोठा प्रश्न आहे. सरकार आपले अपशय झाकण्यासाठी मंदिर उघडण्याचा प्रश्न प्रलंबित ठेवत असल्याचा आरोप करत; ही मंदिरे लवकरात लवकर न उघल्यास भाजपाच्यावतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा भाजपाचे नगर शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी दिला.

     शहर जिल्हा भाजपाच्यावतीने राज्यातील मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरासमोर आरती करण्यात आली. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, ज्येष्ठ नेेते अ‍ॅड.अभय आगरकर, सुनिल रामदासी, वसंत लोढा, सरचिटणीस महेश नामदे, तुषार पोटे, उपाध्यक्ष शिवाजी दहिंडे, संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, अंजली देवकर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

     याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, मंदिरे आपली प्रेरणा आणि शक्तीस्थाने आहेत. देवादिकांच्या आशिर्वादाने आपले जीवन सुख व सुमृद्ध होत असते. ही प्रेरणास्थाने बंद ठेवून सरकार भाविकांना एकप्रकारे वेठीस धरत आहेत. मंदिरातून कोरोना होतो व इतर ठिकाणाहून होत नाही का? राज्य सरकारचा हा निर्णय तुघलकी कारभार असून, त्यामुळे भावनांबरोबर मंदिरावर अवलंबून असणार्‍या अनेक घटकांवर हा अन्याय आहे. मंदिर उघडण्याचा निर्णय घेईपर्यंत आंदोलने केली जातील, असे सांगितले.

     यावेळी वसंत लोढा म्हणाले, सर्वत्र जीवनमान सुरु झाल्याने आता मंदिरे उघडण्यास काही हरकत नसतांना राज्य सरकार फक्त वेळकाढू पणा करत आहे. देवदर्शनाने सर्वांची दु:खे नाहिसे होतात, सात्विक विचार मिळतात, ती मंदिरे बंद ठेवून सरकारला काय सध्या करायचे, हेच कळत नाहीये. याबाबत आम्ही वेळोवेळी आंदोलने करत असून, या आंदोलनास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिला आहे, असे सांगून हे आंदोलन यापुढेही सुरु राहील, असे सांगितले.

     यावेळी सुवेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, बाळासाहेब गायकवाड, महेश तवले, उमेश साठे, अमित गटणे, किशोर बोरा, ज्ञानेश्वर काळे, सुमित बटुळे, शशांक कुलकर्णी, वसंत राठोड, गणेश साठे, पंकज जहागिरदार, आशिष अनेचा, डॉ.ज्ञानेश्वर दराडे, ऋग्वेद गंधे, हुजेफा शेख, बाळासाहेब खताडे, किशोर कटोरे, संदिप मुनोत आदि उपस्थित होते. यावेळी राज्य शासनाच्या मंदिर बंद ठेवण्याच्या भुमिकेचा आसूड मारुन, शंखनाद, घंटानाद करुन निषेध करण्यात आला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles