भिंगारचे कुंडलीतज्ञ तुषार घाडगे राज्यस्तरीय ज्योतिष महामेरू पुरस्काराने सन्मानित
नगर – भिंगार येथील प्रसिद्ध हस्तरेषा कुंडलीतज्ञ तुषार घाडगे यांना राज्यस्तरीय ज्योतिष महामेरू पुरस्कार प्राप्त झाला आहे. छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या ज्योतिष महा अधिवेशनात पुण्याचे जेष्ठ ज्योतिष तज्ञ जयश्री बेलसरे व छत्रपती संभाजी नगर येथील ज्योतिष तज्ञ सीमाताई देशमुख यांच्या हस्ते श्री तुषार घाडगे यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री. घाडगे भिंगारचे रहिवासी असून गेल्या 21वर्षांपासून ज्योतिष मार्गदर्शन करतात.त्यांनी राजकीय, सामाजिक, हवामान, संकटकाळाची भविष्यवाणी वर्तवली होती. ती अनेकदा खरी ठरली. अनेक युवक युवतींचे हस्तरेषा कुंडली पाहून विवाह जुळवण्याची, नोकरी विषयी समस्या दूर करण्याची, कामे त्यांनी केली. यामुळे त्यांना सर्वजण ज्योतिष तज्ञ म्हणून ओळखतात.
ज्योतिष महामेरू पुरस्कार मिळाल्याबद्दल भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुप, स्नेहबंध फाउंडेशन, फिनिक्स फाउंडेशन च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय सपकाळ, उद्धव शिंदे, जालिंदर बोरुडे ,मारुती पवार, महेश गोंडाळ, अजेश पुरी, शिवाजी लवांडे, प्रकाश घाडगे, बबलू नंदे, सागर भुजबळ, छोटू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.