भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्वागत

- Advertisement -

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्वागत

हातात टाळ घेऊन आमदार जगताप दिंडीत सहभागी

वारकऱ्यांच्या आगमनाने शहरातील वातावरण भक्तीमय बनले – आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी) – पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायी दिंडीचे भिंगारमध्ये आगमन होताच हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भक्तीमय वातावरणात जय हरी विठ्ठल.. श्री हरी विठ्ठलच्या गजरात स्वागत करण्यात आले. शहरात पहिल्याच दिंडीचे आगमन झाले असताना वारकरींमुळे वातावरण प्रफुल्लित व भक्तीमय बनले होते.

आमदार संग्राम जगताप यांनी टाळ घेऊन जय हरी… विठ्ठलचा गजर करत दिंडीत सहभाग नोंदवला. हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सर्वेश सपकाळ, प्रांजली सपकाळ व अभिजीत सपकाळ यांनी रथातील पादुका डोक्यावर घेऊन परिसरातून मिरवल्या. दिंडीतील वारकऱ्यांनी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकारामचा जयघोष केला. यावेळी रावसाहेब झावरे, अभिजीत सपकाळ, जहीर सय्यद, रमेश वराडे, मनोहर दरवडे, सतीश सपकाळ, दीपक धाडगे, मच्छिंद्र बेरड, संतोष हजारे, अशोक पराते, बाळासाहेब बेरड, विशाल बेलपवार, बाबासाहेब नागपुरे, शंकरराव बहिरट, ईवान सपकाळ, दीपक लिपाणे, श्रीरंग देवकुळे, दिपक बडदे, मतीन ठाकरे, संकेत झोडगे, भाऊसाहेब गुंजाळ, अस्लम शेख, योगेश करांडे, ओम माळगे, सदाशिव मांढरे, ओम सपकाळ, धीरज नागपुरे, राजेश माळगे, अय्याज शेख, प्रांजली सपकाळ, संगीता सपकाळ, सिंधुताई सपकाळ, अनिता शेलार, यशोदाबाई झावरे, माधवी माळगे, शीतल सपकाळ, लिलाबाई सपकाळ, दिपाली सपकाळ, माही माळगे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आनंदेवाडा श्रीक्षेत्र देवगिरी-दौलताबाद (जि. औरंगाबाद) येथून श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायी दिंडी आषाढी वारीसाठी निघाली आहे. दिंडीचे भिंगारमध्ये मोठ्या भक्तीभावाने स्वागत करण्यात आले. नगर-करमाळा मार्गे ही दिंडी पंढरपूरला प्रस्थान करणार आहे.

सपकाळ परिवाराच्या वतीने पालखीतील पादुकांचे पूजन करण्यात आले. तर आमदार जगताप यांच्या हस्ते आरती करण्यात आली.दिंडीचे प्रमुख ह.भ.प. उध्दव महाराज आनंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संजय सपकाळ म्हणाले की, या दिंडीचे भिंगार शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने स्वागत करण्यात येते. दिंडीला 113 वर्षाची परंपरा असून, शहरात सर्व प्रथम दाखल होणारी ही दिंडी असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, वारकऱ्यांच्या आगमनाने शहरातील वातावरण भक्तीमय बनले असून, त्यांच्या स्वागताला पावसाच्या सरी देखील बरसत आहे. संपूर्ण वातावरण हर्ष, उल्हासाने बहरले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दिंडीतील वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles