भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

- Advertisement -

भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची लागवड करुन महिलांनी केली पूजा

शरीराचे व पर्यावरणाच्या आरोग्यासाठी योग आणि वृक्षरोपण काळाची गरज – संजय सपकाळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रुपच्या सदस्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योगाचे धडे गिरवले. तर उपस्थित महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची लागवड करुन त्याची पूजा केली. वर्षभर योग आणि पर्यावरण संवर्धन चळवळ चालविणाऱ्या हरदिनच्या वतीने नागरिकांना निरोगी व सदृढ आरोग्यासाठी योग करुन वृक्षरोपण करण्याचे आवाहन करण्यात आले.

योगप्रशिक्षक प्रकाश देवळालीकर, विकास भिंगारदिवे, विनोद मुथा, हेमंत गोयल यांनी विविध आसने प्रात्यक्षिकासह सादर करुन विविध आसनांचे शरीरासाठी असलेले फायदे विशद केले. उपस्थित ग्रुपचे सदस्य व नागरिकांनी विविध आसने करुन निरोगी आरोग्यासाठी वर्षभर व्यायाम व योग करण्याचा निर्धार व्यक्त केला. या योग सोहळ्यात महिलांची देखील उपस्थिती होती.

या कार्यक्रमासाठी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, संजय सपकाळ, सुमेश केदारे, दिलीपराव ठोकळ, सर्वेश सपकाळ, दिलीप गुगळे, सचिन चोपडा, जहीर सय्यद, दीपक धाडगे, मनोहर दरवडे, बजरंग दरक, सुभाष पेंढुरकर, अशोक पराते, दीपक बडदे, अभिजीत सपकाळ, अविनाश जाधव, अविनाश पोतदार, दीपक अमृत, सरदारसिंग परदेशी, राजू कांबळे, विठ्ठल राहिंज, तुषार घाडगे, संतोष लुनिया, रमेश कोठारी, डीसीबी बँकेचे संदीप भिसे, सुरज सय्यद, गौरव झिंजुर्डे, ऋषिकेश पानझडे, प्रांजली सपकाळ, आरतीताई बोराडे, संगीता सपकाळ, आशाताई पराते, निर्मला येलुलकर, मीनाताई परदेशी, मीनाताई रासने, कांताबाई स्वामी, निलम त्रिमुखे, मनीषा शिंदे, अशोक लोंढे, शिरीष पोटे, जालिंदर बेल्हेकर, सुहास देवराईकर, किरण कुलारी, संतोष हजारे, संपत बेरड, सुधीर कपाले, अनिल सोळसे, दिनेश शहापूरकर, ईवान सपकाळ, शेषराव पालवे, सुहास देवराईकर आदी उपस्थित होते.

संजय सपकाळ म्हणाले की, शरीराचे व पर्यावरणाच्या आरोग्यासाठी योग आणि वृक्षरोपण काळाची गरज बनली आहे. अनेक वर्षापासून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य चळवळ चालविण्यात येत आहे. ग्रुपचे चारशेपेक्षा जास्त सदस्य असून, ते दररोज सकाळी भिंगारच्या जॉगींग पार्कमध्ये एकत्र येऊन योगा करत असतात. निरोगी आरोग्यासाठी नागरिकांना वर्षभर व्यायाम व योग करण्याची गरज आहे. योगने निरोगी राहून व पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावून देशाची सेवा घडविण्याचे त्यांनी आवाहन केले.

वर्षभर योग, प्राणायाम, हास्य योग व पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपला डीसीबी बँकेच्या वतीने साऊंड सिस्टमची भेट देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर भगवाने, अशोक भगवाने, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, सखाराम अळकुटे, नवनाथ वेताळ, जालिंदर अळकुटे, शेषराव पालवे, मुन्ना वाघस्कर, गोरख उबाळे, बापूसाहेब तांबे, विनोद खोत, महेश सरोदे, नवनाथ खराडे, जालिंदर बेरड, दत्तात्रेय लाहुंडे, योगेश चौधरी, धीरज नागपुरे, विकास निमसे, अजय खंडागळे, संदीप नायडू, अशोक लिपारे, नामदेव जावळे आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles