अहमदनगर प्रतिनिधी – भिंगार छावणी परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली असुन भिंगार छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी भिंगार मंडलचे अध्यक्ष वसंत चांदमल राठोड यांची निवड करण्यात आली ब्रिगेडियर व्ही.एस.राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत उपाध्यक्ष पदाचा शपथविधी कार्यक्रम पार पडला तसेच छावणी परिषद कार्यालय परिसरात छोटेखाणी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भिंगार छावणी मंडळाचे नूतन उपाध्यक्ष वसंत चांदमल राठोड यांना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंदे, भिंगर छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा चिटणीस तुषार पोटे, युवा मोर्चाचे किशोर करोटे, लक्ष्मीकांत तिवारी, रवि राठोड यांच्यासह भिंगार शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना मुंगे, समाजसेविका वैशाली कटोरे, सौ.संगीता मुळे, सौ. सरोजिनी दिलीप गांधी, यांच्यासह भिंगार शहरातील प्रतिष्ठित नागरिक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
वसंत चांदमल राठोड यांची भिंगार छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी शुभेच्छा दिले व भिंगार येथील नागरिकांसाठी जे समस्या असतील ते सोडविण्याचे कार्य होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अनेक वर्षांपासून एकनिष्ठेने काम करत असल्यामुळे पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी दिली असल्याने दिलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडून भिंगार शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे वसंत राठोड यांनी यावेळी सांगितले.