भिस्तबाग महाल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न
पर्यावरणाचे संतुलन काळाची गरज – आ.संग्राम जगताप
नगर : पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ऋतुमानात बदल होताना दिसत असून अवेळी पडणारा पाऊस, थंडी, उष्णता याचबरोबर महानगरांमध्ये वायु प्रदूषण मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत चालले आहे. यावर्षी उन्हाळ्यात शतकातील सर्वात जास्त उष्णतेची लाट पसरली होती. भविष्यकाळात मोठा धोका निर्माण होऊ नये यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची खरी गरज आहे. तरी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेऊन वृक्षरोपणनाची लोक चळवळ उभी करावी वृक्ष समितीचे माजी अध्यक्ष संपत बारस्कर यांनी वृक्षारोपण करून जतन करण्याचे सुरु असलेले काम कौतुकास्पद असून पर्यावरण संतुलन काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या वतीने भिस्तबाग महाल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करताना आ.संग्राम जगताप समवेत मा. नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, किसन कजबे, साहेबराव कजबे,संपतभाऊ बारस्कर, प्रा.अरविंद शिंदे,सतीश ढवन,स्वप्नील ढवन,रंजना उकीर्डे,गणेश बारस्कर,अंकुश बोरुडे,महेश पाटील,राहुल कजबे,दिनेश खेडकर,चंद्रभान कडूस,,गणेश बोरुडे, मारुती एडके,कैलास उशीर,बाली बांगरे आदी उपस्थित होते.
मा.मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर म्हणाले की, विकासाच्या कामाबरोबर सामाजिक उपक्रम राबवित असताना नागरिकांनी एकत्र येऊन वृक्षारोपणाची लोक चळवळ हाती घ्यावी व त्याचे संवर्धन करावे वृक्षाचे महत्व समाजाला पटवून देण्यासाठी सर्वांनी काम करावे याचबरोबर वड, पिंपळ, लिंब आदी झाडे मोठ्या प्रमाणात लावावी भिस्तबाग महाल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वडांच्या झाडाचे रोपण केले असून संवर्धन केले जाणार आहे. यापूर्वी लावलेल्या झाडाचे संवर्धन केले असल्यामुळे आज ही झाडे आपल्याला सावली देत आहे किसन कसबे यांनी मागील वर्षी लावलेले 25 झाडे जगवली आहे. झाडांचे केलेल्या संवर्धनाच्या माध्यमातून मनाला आनंद वाटत असतो असे ते म्हणाले.
- Advertisement -