मनपाची आरोग्य यंत्रणा सज्ज असून तिसरी लाट परतवून लावू – महापौर व उपमहापौर

शहरात ओमिक्रोनचा रुग्ण नाही

अहमदनगर प्रतिनिधी – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर उपमहापौर गणेश भोसले यांनी मनपा प्रशासनास व आरोग्य विभागात उपाय योजना संदर्भात पत्र दिले होते त्या पत्राची दखल घेत आरोग्य विभागाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महापौर,उपमहापौर यांनी आरोग्य विभागास सूचना केल्या की, नगर शहरामध्ये रुग्ण संख्या वाढत असून रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या वाढविण्यात याव्या. आरोग्य यंत्रणेवर ताण पडू नये, यासाठी आरोग्य कर्मचारी भरती करावी, शहरांमध्ये ३११ रुग्ण ऍक्टिव्ह असून ९० टक्के रुग्ण होमक्वारंटाईन आहे व ३५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.येत्या नऊ दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.

केडगाव – नागापूर तसेच गर्दीच्या ठिकाणी मनपा दक्षता पथकाची नेमणूक करून उपाययोजना कराव्यात  व लसीकरणाबाबत तपासणी करावी,ओमिक्रोनचा एकही रुग्ण शहरांमध्ये आढळलेला नाही.नागरिकांनी घाबरून जाऊ नये शहरात तिसरी लाट आलेली नाही.नागरिकांनी घाबरून जाऊ नये,तिसरी लाट शहरात पसरवू नये यासाठी मनपाची आरोग्य यंत्रणा सक्षमपणे उभी आहे.

विळदघाटातील विखे पाटील हॉस्पिटल येथे ४०० बेडची सुविधा उपलब्ध केली असून जिल्हा रुग्णालय येथे शहरातील रुग्णांसाठी ते ३० टक्के जागा उपलब्ध करून ठेवलेली आहे.तसेच मनपाचे नटराज हॉटेल येथे २५० बेडचे कोविडसेंटर उभारले आहे.तरी नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान महापौर रोहिणीताई शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.

या झालेल्या बैठकीत मनपा आयुक्त शंकर गोरे,उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ.सतीश राजूरकर,सभागृहनेते अशोक बडे आदीसह मनपाच्या आरोग्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles