कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
महसुल विभाग व महाराष्ट्र शासन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत ७/१२ वाटप आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती पासून सुरू करण्यात येत आहे.
या अनुषंगाने कर्जत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी पत्रकारांना दिली.
यावेळी निवासी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, महसूल नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले तसेच संबंधित गावचे ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, पदाधिकारी यांची उपस्थितीती होती.
आज तालुक्यातील किमान एका गावात या योजनेचा शुभारंभ करण्याबाबत नियोजन करण्यात आले होते.या मध्ये शेतकरी खातेदार यांना त्यांच्या घरी जाऊन तलाठी यांचे मार्फत ७/१२ देण्यात आला. याशिवाय,गावातील माजी सैनिक अथवा कार्यरत सैनिक यांचे कुटुंबीय,१९४७ सालात जन्म झाला आहेत असे खातेदार,कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे असे शेतकरी २ ऑक्टोबर जन्मतारीख असलेले खातेदार, गावातील वरिष्ठ महिला खातेदार यांना आज मोफत ७/१२ वितरित करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी थेरवडी येथे तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या उपस्थितीत गांधी जयंती साजरी करण्यात येऊन शेतकरी खातेदारांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत डिजिटल स्वाक्षरी युक्त ७/१२ चे वाटप करण्यात आले.अशाच प्रकारे नागापूर येथे निवासी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे तसेच निंबोडी येथे महसूल नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांच्या उपस्थितीत तसेच संबंधित गावचे ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, पदाधिकारी यांचे उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ कर्जत तालुक्यात करण्यात आला.
या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सर्व गावात १००% शेतकरी खातेदारांना मोफत ७/१२ चे वाटप घरपोच तलाठी यांचेमार्फत करण्यात येणार आहे असे तहसीलदार नानासाहेब आगळे बोलताना म्हणाले.