महात्मा फुले कृषी विद्यापीठ क्रीडा भवन येथे 28 एप्रिलला खुल्या गटातील मैदानी स्पर्धेचे आयोजन
खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी क्रीडा भवन येथे 28 एप्रिल रोजी खुल्या गटातील पुरूष व महिलांसाठी ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
ॲथलेटिक्स स्पर्धेत 100, 200, 400, 800, 1500 व 5000 मीटर धावणे, लांब उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, 110 व 400 मीटर हार्डल्स आणि 20 कि.मी. चालणे स्पर्धा होणार आहे. 16 वर्षे पूर्ण झालेल्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. भाला फेक व हातोडा फेकच्या खेळाडूंना आपल्या स्वतःचा भाला व हातोडा बरोबर घेऊन येण्याचे सांगण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात देणार आहे. पहिल्या तीन क्रमांकाच्या खेळाडूंची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धा 23 मे ते 25 मे या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. त्याचप्रमाणे सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे.
या स्पर्धेतील खेळाडूंना राज्य गुणवत्ता प्रमाणपत्र 5 टक्के नोकरीसाठी व राज्य व जिल्हा सहभाग प्रमाणपत्र लष्कर भरतीसाठी उपयोगी पडणार आहे. या स्पर्धेसाठी दिनेश भालेराव, राहुल काळे, संदीप हारदे, रावसाहेब मोरकर, जगन गवांदे, श्रीरामसेतू आवारी, संदीप घावटे, अजित पवार, संभाजी ढेरे, राघवेंद्र धनलगडे, दिनेश भालेराव, राहुल काळे, संदीप हारदे आदी प्रयत्नशील आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन प्रवेश अर्ज स्पर्धेच्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत जमा करण्याचे सांगण्यात आले आहे.