महात्मा फुले यांनी आयुष्यभर केवळ मानवाच्या हिताचा विचार केला – दत्ता जाधव

- Advertisement -

नंदनवन मित्र मंडळ व महात्मा फुले समता परिषदच्यावतीने महात्मा फुले यांना अभिवादन

महात्मा फुले यांनी आयुष्यभर केवळ मानवाच्या हिताचा विचार केला – दत्ता जाधव

नगर –  महात्मा ज्योतिबा फुले हे मानवतावादी समाजसुधारक होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी मानव हिताचा विचार केला. तत्कालीन समाजातील अनिष्ठ रुढी-परंपरांना विरोध करत सर्वांना समभावाची वागणुक देणार्‍या समाजाची निर्मिती केली. दुर्लक्षित घटकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत  त्यांना शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. महात्मा फुले समता परिषद त्यांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्याचे काम कृतीतून करत आहे. समाजात जागृती निर्माण करण्याचे काम महात्मा फुले यांचे साहित्य करेल, असा विश्वास समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांनी केले.

     नंदनवन मित्र मंडळ व महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने टिळक रोड येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, मंडळाचे मार्गदर्शक दत्ता जाधव, पप्पू भाले, विठ्ठल जाधव, श्रीकांत चेमटे, गौरव ढोणे, जालिंदर वाघ, विलास उबाळे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, महात्मा फुले हे 19 व्या शतकातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. परंपरागत जातिव्यवस्था, गुलामगिरी, अज्ञान यांविरुद्ध बंड करणारे पहिले कृतिशील समाजसुधारक होते. अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, शेतकर्‍यांच्या प्रश्नांना फोडलेली वाचा, या कार्यामुळे त्यांना ‘महात्मा’ ही पदवी जनतेने अर्पण केली होती. त्यांचे विचार आणि लेखन हे आजही आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत.

     यावेळी किरण काळे, भगवान फुलसौंदर आदिंनी मनोगतातून महात्मा फुले यांच्या संघर्षमय जीवनप्रवास  सांगितला. शेवटी जालिंदर वाघ यांनी आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles