अहमदनगर प्रतिनिधी –
अहमदनगर महानगरपालिका कोरोना दक्षता पथकांच्या वतीने कोरोना नियमावली अंतर्गत शहरातील बिग बाजार,दीपक एजन्सी,बिकानेर स्वीटस,रुचिरा स्वीटस,एशियन फार्मसी,काका हलवाई,आसरा ट्रेडर्स या विविध दुकाने,मॉल व खाजगी आस्थापना वरील ३१६ कर्मचाऱ्यांची कोरोना RTPCR चाचणी करण्यात आली.
या दुकानाचे व्यवस्थापक यांनी स्वतःहून पत्र देत कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याची मागणी केली याच प्रमाणे शहर आणि उपनगरातील व्यावसायिक, दुकानदार आणि खाजगी आस्थापना यांनी पुढाकार घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केल्यास कोरोना प्रादुर्भाव होण्यास आळा बसेल असे कोरोना दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान यांनी सांगितले.
नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन आयुक्त श्री.शंकर गोरे, उपायुक्त श्री.यशवंत डांगे आरोग्य अधिकारी डॉ.श्री.सतीश राजूरकर आणि सर्व पदाधिकारी अधिकारी यांनी केले आहे.
RTPCR चाचणी करण्यात येणाऱ्या ठिकाणी आयुक्त श्री.शंकर गोरे,उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांनी भेट देऊन सूचना दिल्या व मार्गदर्शन केले.
RTPCR चाचणी मोहिमेत दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान,सहाय्यक नंदकुमार नेमाणे, सूर्यभान देवघडे, राहुल साबळे, भास्कर आकुबत्तीन, अनिल आढाव, अमोल लहारे, राजेश आनंद, राजू जाधव, रिजवान शेख, विष्णू देशमुख, राजेंद्र बोरुडे, कांगुर्डे सर, गणेश वरुटे, नंदू रोहोकले,श्री.अमित मिसाळ उपस्थित होते.
RTPCR चाचणी करण्यासाठी जिजामाता आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सौ.आयशा शेख,सिस्टर सौ.कविता खिलारी,लॅब टेक्निशियन श्री.बाळासाहेब घुमरे,श्री.अक्षय चाहेर,डेटा ऑपरेटर मोहिनी दिकोंडा
तसेच सिव्हिल आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.शिल्पा रंदाळे- चेलवा, तसेच डॉ.श्री. मनोहर देशपांडे,सिस्टर सौ.वर्षा कोल्हे,डेटा ऑपरेटर श्री.ओंकार अंकराम,लॅब टेक्निशियन भावना वैरागर,सोनाली शिंदे व श्री.योगेश गडाख यांचे सहकार्य लाभले.