नितेश कराळे व व्यंग चित्रकार गणेश वानखडे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट टाकून जातीय व सामाजिक भावना दुखावल्याने तेली समाजाचा तीव्र निषेध
अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर
महाराष्ट्र राज्यातील वर्धा येथील रहिवाशी नितेश कराळे व व्यंग चित्रकार गणेश वानखडे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट टाकून जातीय व सामाजिक भावना दुखावल्याने तेली समाजाने तीव्र निषेध करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक संघटनेच्यावतीने नायब तहसीलदार आर जी दिवाण याना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे,जेष्ठ कार्यकर्ते गोकुळ काळे,तेली युवा आघाडीचे अध्यक्ष विक्रम शिंदे,कार्याध्यक्ष गणेश धारक,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दारुणकर,गोकुळ शिंदे, युवा आघाडीचे सदस्य श्रीकांत ढवळे,उमाकांत डोळसे आदी उपस्तिथ होते.
नितेश कराळे यांनी नुकतेच फेसबुकवर मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे तेल काढणारे तेली आहेत.असे हे आक्षेपार्ह व्यंगचित्र असलेले पोस्ट टाकण्यात आली आहे.त्यामध्ये पंतप्रधान हे तेलाच्या घाण्यामध्ये शेतकऱ्यांना टाकून त्यांचे तेल काढत असल्याची व्यंगचित्राची पोस्ट त्यांनी प्रसिद्ध केली आहे.त्यांनी तयार केलेल्या चित्रामुळे समस्त तेली समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
तेली समाज हा शांतता प्रिय आहे.शेतकऱ्यांचा बांधव आहे.तेल काढण्याचा घाना हा चित्रामध्ये भारताचे केंद्र सरकारचा दरबार आहे.तसेच शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात दाखवलंस गेला आहे.तेली समाजाचा तेलघाना हे पवित्र महादेवाची पिंड असून त्याची आम्ही तेली लोक भक्तिभावाने पूजा करतो व घाना हे व्यवसायाचे साधन व प्रतीक आहे.स्वतःपंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे तेली समाजाचे आहेत.
त्यामुळे सदरची पोस्ट टाकून तेली समाजाच्या भावना जाणीवपूर्वक दुखावन्यात आल्या आहेत.त्यामुळे विनाकारण सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था बिखडविण्याचे व समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा गंभीर गैर प्रकार आहे.या घटनेचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे.
आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे नितेश कराळे व व्यंग चित्रकार गणेश वानखडे यांचा जाहीर निषेध करून कठोर शासन करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्यावतीने नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी दिला आहे.