महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नेवासा तालुका प्रेस फोटोग्राफर पदी अभिषेक गाडेकर यांची निवड.

- Advertisement -

नेवासा प्रतिनिधी – काकासाहेब नरवणे

नेवासा येथील विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुक्यातील सर्व सदस्यांची बैठक पार पडली यावेळी एकमताने प्रेस फोटोग्राफर अभिषेक गाडेकर यांची नेवासा तालुका प्रेस फोटोग्राफर अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली .

यावेळी राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे व जिल्हा उपाध्यक्ष अरुण सोनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुका अध्यक्ष मोहन गायकवाड मार्गदर्शक मकरंद देशपांडे, राम शिंदे, यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी पत्रकारांच्या न्याय हक्का साठी सदैव तत्पर राहणार व पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडणार असल्याचे प्रतिपादन गाडेकर यांनी केले या वेळी नेवासा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

गाडेकर यांच्या निवडी बद्दल मा नामदार शंकरराव गडाख साहेब प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव जिल्हा अध्यक्ष अनिल रहाणे जिल्हा उपाध्यक्ष अरुण सोनकर, जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगे , नेवासा तालुका अध्यक्ष मोहन गायकवाड, उपाध्यक्ष गणेश दारकुंडे, विकास बोर्डे, कार्याध्यक्ष अशोक तुवर, मार्गदर्शक मकरंद देशपांडे, राम शिंदे, प्रसिध्दी प्रमुख पवन गरुड, सतिष उदावंत, पोर्टल मीडियाचे प्रमुख ऋषभ तलवार, इलेक्ट्रॉनिक मीडिया चें मंगेश निकम, तालुका संघटक सोमनाथ कचरे, काका नरवणे, सचिव विलास धनवटे, सचिन कडू, महेश देवढे , ग्रामीण विभाग प्रमुख बाळासाहेब पंडित, दत्तात्रय शिंदे, कायदे सल्लागार मयूर वाखुरे, प्रतीक तलवार, राजेंद्र कडू,आम्ही नेवासकर चे सौरभ मुनोत, राहुल चिंधे, तसेच राजकीय, प्रशासकीय, अधिकारी, व सामाजिक कार्यकर्ते , यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध पत्रकार संघाचे अध्यक्ष व पत्रकारांनी यांनी अभिनंदन केले आहे

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!