अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या घरेलू कामगार मंडळाचे सभासद नोंदणी ओळखपत्राचे वाटप अहमदनगर जिल्हा श्रमिक संघटित कष्टकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष विलास कराळे पाटील यांच्या हस्ते सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे वाटप करण्यात आले यावेळी सहसचिव सौ.मीना कराळे, नम्रता कराळे, रेश्मा भांगरे, सरोज सुपेकर, चंद्रकला वाघ, सुनिता कहाने, सिंधू कदम, मीना सोनवणे, सुनीता बडकस, सुरया पठाण, लतिका यादव, अनिता फाळके, शोभा इंगोळे, पुष्पा स्वामी, अंजली डहाळे, कांताबाई वराडे, सीमा खरात, अंजना गांधी, उषाताई घुले आदींसह घरेलू कामगार व संघटनेचे सभासद उपस्थित होते.
अहमदनगर शहरातील घरेलू कामगारांना न्याय देण्यासाठी संघटनेच्या माध्यमाने आंदोलन करणार आहे व घरेलू कामगारांचे वय ६० वर्ष होऊन गेल्यावर त्यांना सरकारच्या माध्यमाने पेन्शन देण्यासाठी मागणी केली तसेच सरकारने घरेलू कामगारांचे मुलांचे शिक्षणासाठी सवलती देण्यात यावे तसेच घरेलू कामगारांना घरकुल मध्ये घरकुल देण्याची देखील मागणी बैठकीत करण्यात आली तसेच घरेलू कामगार महिला अफाट कष्ट करून आपल्या मूळ बाळांचा सांभाळ करतात त्यामूळे ते मुलांचे शिक्षण करतात व खंबीरपणे आपल्या सर्व कुटुंबास सांभाळतात पण सरकार त्यांना न्याय देत नाही जर घरेलू कामगार नोंदणी चालू आहे पण सरकार त्यांना न्याय देत नाही त्यामूळे शासनाने त्यांना ओळखपत्र दिले आहे पण त्यांना सवलती कोणतेच देण्यात आलेले नाही त्यामुळे त्यांना सवलती मिळण्यासाठी संघटनेच्या मार्फत लढा उभारणार असल्याचे अहमदनगर जिल्हा श्रमिक व संघटित कष्टकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष विलास कराळे यांनी सांगितले.