कर्जत प्रतिनिधी – महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये अन्यथा आंदोलन करू,असा इशारा भाजप किसान आघाडी यांच्या वतीने आज कार्यकारी अभियंता कर्जत यांना निवेदन देऊन देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कडून तालुक्यातील शिंदा व नांदगाव येथील शेतकऱ्यांना त्यांच्या कडील थकबाकी मुळे कुठलीही पूर्व सूचना न देता त्यांच्या ग्रुप व वैयक्तिक पण शेतीच्या रोहित्र चे वीज कनेक्शन तोडले.
त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे कनेक्शन पूर्ववत सुरू करण्यासाठी व तालुक्यातील इतर सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीस दिल्याशिवाय कनेक्शन तोडू नये, यासाठी आज कार्यकारी अभियंता श्री.जमदाडे यांना भाजपच्या वतीने निवेदन दिले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.सुनील गावडे भाजपा किसान आघाडी चे सरचिटणीस सुनील यादव,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ज्ञानदेव लष्कर,ओबीसी मोर्चाच्या सौ.आशाताई वाघ,हनुमंत गावडे,आदित्य भोज,सोना भिसे मोहन घालमे व शिंदा व नांदगाव येथील सर्व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे साहेब यांनी भ्रमणध्वनी वरून श्री.जमदाडे यांना पूर्वसूचना न देता डीप्याचे ( रोहित्र ) कनेक्शन तोडल्याबद्दल जाब विचारून तातडीने त्यांचे कनेक्शन जोडून पूर्ववत करण्याची सूचना केली अशी माहिती भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांनी दिली.