नील क्रांती चौक येथे भीम उत्सवाचा जल्लोषात प्रसिद्ध गायिका सुषमाताई जावळे यांचे गीताचे सादरीकरण.
माझ्या भिमान सोन्याने भरली ओटी या भीम गीतावर वातावरण झाले भीममय.
अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताह सर्वत्र मोठ्या आनंदात साजरा होत असतो जयंती सप्ता निमित्त दिल्लीगेट येथील नीलक्रांती चौक येथे निल क्रांती मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सुषमाताई जावळे यांच्या भीम बुद्ध गीताचा गायन कार्यक्रम मोठ्यात जल्लोषपूर्ण वातावरणात घेण्यात आला. क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे व फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या हस्ते भीम उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सुषमाताई जावळे यांच्या भीम गीत “माझ्या भिमान सोन्याने भरली ओटी” “भीमराज कि बेटी मै तो जय भीम वाली हु” यासारख्या गाण्यांमुळे सर्व वातावरण भिम्मय झाले होते.
यावेळी माजी नगरसेवक अजय साळवे, प्राध्यापक जयंत गायकवाड, प्राध्यापक भीमराव पगारे, महेश भोसले, सुनील साळवे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश साळवे, किशोर साळवे, विनाताई कांबळे, अनुराधाताई साळवे, भगवानराव साळवे, शरद जाधव, विलास साठे, सुमेध गायकवाड, बाबासाहेब विधाते, नितीन कसबेकर, सतीशकुमार चाबुकस्वार, सुशांत म्हस्के, बौद्धचार्य संजय कांबळे, रवींद्र वाकचौरे, तुकाराम गायकवाड, विशाल गायकवाड, अशोक साळवे, सुमेध साळवे, विनोद भिंगारदिवे, सुरेश शिरसाठ, आकाश साळवे, रोहित आव्हाड, राजेंद्र शिरसाट, वृषाल साळवे, निखिल साळवे, श्रीकांत भोसले, प्रशांत भोसले, रवींद्र शिंदे, अविनाश शिंदे, विक्रम शिंदे, विनायक संभागळे, मनोज साळवे, गणेश साळवे, विनोद साळवे, सुशांत शिरसाट, मयूर पाचारणे, गोपी साळवे, अक्षय वाकचौरे, सुशांत भोसले, संदेश भोसले, सुजित साळवे, किरण साळवे, मेहेर मिसाळ, अक्षय साळवे, मिलिंद साळवे, संदीप साळवे, तेजस पाचारणे, किरण पवार आदीसह परिसरातील व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.