मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिक दिन साजरा

- Advertisement -

ज्येष्ठांनी नव्या पिढीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा – शिवाजीराव ससे

अहमदनगर प्रतिनिधी – समीर मन्यार

दरवर्षी 1 ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठ नागरिक हा समाजासाठी अत्यंत महत्वाचा घटक असून, त्यांची काळजी व त्यांना मिळणार्‍या सुविधांकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. कारण प्रत्येकजण एक ना दिवस वृद्ध होणार आहे.

वृद्धांची सेवा ही खर्‍या अर्थाने पुण्यकर्म आहे. वृद्धत्व कठीण असे आपण अनेकदा ऐकतो व त्यावर वृद्धांच्या मानसिकतेला गृहित धरतो. ज्येष्ठ नागरिकांनी नव्या पिढीकडे मोकळा ढाकळा दृष्टिकोन ठेवून पाहिल्यास आणि तरुणांनीही त्यांना समजून घेतल्यास समस्यांची तीव्रताही कमी होईल, असे प्रतिपादन स्टेशन परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव शिवाजीराव ससे यांनी केले.

स्टेशन परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आज (दि. १) मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसमवेत ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी शिवाजीराव ससे, अशोक आगरकर, नानासाहेब दळवी, दत्तात्रय फुलसौंदर, ज्ञानेश्‍वर कविटकर, इंजि. नूरआलम शेख, अ‍ॅड. विजय लुणे, श्रीधर नांगरे, श्रीकृष्ण लांडगे, किशोर वाघमारे, श्रीमती जया जोशी, श्यामला साठे, सुलभा लांडगे, सर्वोत्तम क्षीरसागर, वृद्धाश्रमचे व्यवस्थापक महावीर जैन आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

उपाध्यक्ष इंजि. नूरआलम शेख म्हणाले की, एक गोष्ट आपण बर्‍याचदा पाहतो ती म्हणजे काही ज्येष्ठ मंडळी त्यांच्याहून वयाने लहान किंवा पुढील पिढीतील मंडळींसोबत मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या अंतरंगात दु:ख नसतं असं नसतं. मात्र व्यक्ती तितक्या प्रवृत्तीप्रमाणे ज्येष्ठांच्या समस्याही त्यांच्या वयानुसार व कौटुंबिक स्थितीनुसार वेगवेगळ्या असतात.

आज आम्ही सर्वजण ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र आलो असून, ज्येष्ठांसमवेत ज्येष्ठ नागरिक दिन दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करीत आहोत. मातोश्री वृद्धाश्रमाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून स्टेशन परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने किराणा सामान व रोख देणगी देऊन मदत केली आहे. समाजातील दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

ज्ञानेश्‍वर कविटकर यांनी आपला वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिला व पुरुषांसमवेत साजरा करून त्यांना आनंद दिला. यावेळी त्यांनी माझ्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाल्याचे सांगितले.

ज्येष्ठ महिलांनी यावेळी त्यांचे औक्षण करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles