माध्यमिक विद्यालयाच्या इसळक निंबळक शाळेतील मुख्याध्यापकांच्या कार्यालयाचे कुलूप तोडून कागदपत्र गहाळ केल्याने गुन्हा दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- तपोवन रोड द्वारका पॅलेस येथील शिक्षक नंदकुमार केशवराव तोडमल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रामविकास विद्या प्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय इसळक निंबळक येथे सन १९९२ सालापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे. दिनांक ३१ मे २०२४ रोजी सेवा जेष्ठते नुसार भानुदास सिताराम कोतकर हे सेवानिवृत्त झाल्याने माझ्याकडे सदर विद्यालयाचा मुख्याध्यापकाचा चार्ज दिला होता.
दि. ६ जून २०२४ रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास माजी मुख्यध्यापक भानुदास सीताराम कोतकर यांनी मला फोन करून सांगितले की शाळेचा शिपाई दत्तात्रेय मुठे याचा फोन आला होता की मी शाळेच्या बाहेर ड्युटीला असताना रात्री ८.४५ च्या सुमारास नितीन भाऊसाहेब कोतकर, अविनाश भाऊसाहेब कोतकर, बाबासाहेब कारभारी रहाटळ पर्यवेक्षक , संतोष भोसले एस एस फर्निचर, हे शाळेत येऊन शिपाई मुठे यांच्याकडे मुख्याध्यापक यांच्या ऑफिसची चावी मागितली असता मुठे यांनी सांगितले की मी रात्री ड्युटी करतो असे म्हणाले म्हणाल्याने वरील चारही आरोपींनी कुलूप तोडण्याच्या कटर व कुदळीने मुख्याध्यापक कार्यालयाचे विना परवानगीने ३ कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला व थोड्या वेळाने स्वतः जवळील नवीन कुलूप लावून निघून गेले असल्याने वरील चारही आरोपींवर मुख्याध्यापक चार्ज असणारे नंदकुमार तोडमल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ४४८, ४२७ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.