मार्कंडेय संकुल येथे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने वृक्षारोपण
वृक्षारोपण चळवळीत प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे – संदिप दातरंगे
नगर – आज निसर्गचक्रम बदलले आहे, ग्लोबल वार्मिंगमुळे हे होत आहे. पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी वृक्षारोपण हे महत्वाचे आहे. त्यासाठी शासनासह, सामाजिक संस्थांच्या उपक्रमातून वृक्षारोपणाची मोठी जनचळवळ उभी राहत आहे. यात आपणही पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावले पाहिजे. श्री स्वामी प्रतिष्ठान दरवर्षी विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करुन त्यांचे संवर्धन करत आहे, त्याचबरोबर वैयक्तिक वृक्ष वाटप करुन संवर्धनाची जबाबदारी देत आहे. आज मार्कंडेय संकुल परिसरात वृक्षारोपण केले असून, त्याची जबाबदारी संकुलच्या पदाधिकार्यांनी घेतली आहे. भविष्यात या ठिकाणी हे वृक्ष चांगले बहरतील, असा विश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप दातरंगे यांनी केले.
मार्कंडेय संकुल येथे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप दातरंगे, शुभम दातरंगे, मार्कंडेय देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलाराम, सेक्रेटरी कुमार आडेप, विश्वस्त अजय गुरुउ, रघुनाथ गाजेेगी, विष्णू बत्तीन, भिमराज शिरसुल, रमकांत बिज्जा, गणेश आकेन, विनायक बत्तीन, नारायण ऐक्कलदेवी, लक्ष्मण इगे, हनुमंत जोग, चंद्रकांत सब्बन, मोहन चेन्नुर, हनुमान म्याकल, सिताराम ढगे, अमोल गाजेंगी, रवि नल्ला, यश मंचे, आकाश शिरसुल आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी ज्ञानेश्वर मंगलाराम म्हणाले, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यात अग्रेसर राहून सामाजिक दायित्व जपत आहे. आज वृक्षरोपणाचे महत्व सर्वांना कळले आहे. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन केले पाहिजे. आज आमच्या मार्कंडेय संकुलात लावण्यात आलेले वृक्षांचे संवर्धन चांगल्या पद्धतीने करुन ही वृक्ष मोठी होतील याची जबाबदारी घेतली आहे. सामाजिक कार्यासाठी आमचे नेहमीच सहकार्य असते, असे सांगितले.
प्रास्तविकात शुभम दातरंगे यांनी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन रमाकांत बिज्जा यांनी केले तर विनायक बत्तीन यांनी आभार मानले.