अहमदनगर प्रतिनिधी –
जुनी महानगरपालिका आशा टॉकीज चोक ते विशाल गणेश मंदिर ते पंचपीर चावडी ते वाडिया पार्क ते जुनी महानगरपालीका ते दो बोटी चिरा ते महानगरपालिका गँरेज ते शिवम टॉकीज ते गणेश मंदिर ते भोपळे गल्ली रस्त्याचे डांबरीकरण व काँक्रीटिकरणरक्कम ७० लाखाचे काम मंजूर झालेले असून सदर कामाची वर्कऑर्डरही ठेकेदारास देऊन ३ ते ४ वर्ष झालेले असून सदरील प्रकार नागरिकांना वेठीस धरण्याचा आहे .वरील सर्व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून नागरिकांना व वयोवृद्ध लोकांना रहदारीस त्रास होत असून सदरील खड्यामुळे तू व्हीलरच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे .तसेच नागरिकांना मणक्याचा त्रासास सामोरे लागत आहे . ठेकेदार मनमानी पद्धतीने कारभार करीत आहे .तथापि सदरील काम अद्यापपर्यंत सुरु करण्यात आलेले नसून या भागातील फेज २ च्या योजनेचे कामही अर्धवट ठेवलेले असून ते फक्त १ ते २ दिवसाचे काम बाकी आहे .तरी ते काम पूर्ण करून वरील डांबरीकरनाचे व काँक्रीटिकरनाचे काम ताबडतोब सुरु करण्यात यावे अन्यथा सदरील काम रद्द करून नव्याने फेर निविदा काढण्यात याव्यात .आमच्या निवेदनाचा विचार न झाल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा नगरसेवक बाळासाहेब बोराटे व नगरसेविका मंगलताई लोखंडे ,परेश लोखंडे यांनी दिला आहे .