माळी समाज जिल्हाउपाध्यक्षपदी निवड झालेल्या बाळासाहेब भुजबळ यांचा दीनदयाळ परिवारातर्फे सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर जिल्हा माळी समाज सेवा संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब भुजबळ यांचा दीनदयाळ परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ दिला. यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सुनील पंडित, दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष धनंजय तागडे, सोमनाथ चिंतामणी, विशाल गणेश देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त अशोक कानडे, कुंभार समाजाचे नेते नाथा मामा देवतरसे, महावीर कांकरिया, आप्पा खताडे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना वसंत लोढा यांनी म्हंटले की , भुजबळ हे नगरमधील विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रांत मोठ्या धडाडीने झोकून गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून कार्यरत आहेत. समता परिषदेत मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल चे शहराध्यक्ष म्हणून तसेच मध्यंतरी झालेल्या सकल ओबीसी समाजाच्या मेळाव्यात त्यांनी उल्लेखनीय असे काम केले. त्यांच्या कामाची दखल ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी देखील घेतली.
ओबीसी समाजाचे नगर शहरात नेतृत्व करतांना मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे माळी समाजाचे नेतृत्व आल्याने आता ओबीसी घटकासाठी बरेच काही करण्याची जबाबदारी आली आहे. ती ते निश्चितपणे उत्तम प्रकारे पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुनील पंडित, धनंजय तागडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले. माळी समाजाचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळाली असून ओबीसी समाजाचे आरक्षण महात्मा फुले विकास महामंडळाला मोठा निधी, ओबीसी सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती, त्यांच्या उद्योगांना अनुदान मिळवण्यासाठी शाशन दरबारी प्रयत्न असे उपक्रम आपण हाती घेणार आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी दिले.
- Advertisement -