मुंबईत घडलेल्या दुर्दैवी घटनेची शहरात पुनरावृत्ती घडू नये म्हणून सावेडी येथील एसटी महामंडळाच्या जागेवर विनापरवाना साई फन फेअर त्वरित बंद करण्याची मागणी

- Advertisement -

मुंबईत घडलेल्या दुर्दैवी घटनेची शहरात पुनरावृत्ती घडू नये म्हणून सावेडी येथील एसटी महामंडळाच्या जागेवर विनापरवाना साई फन फेअर त्वरित बंद करण्याची मागणी

जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक व अग्निशमन विभागाची परवानगी नसताना कोणाच्या आशीर्वादाने हे चालू

महामार्ग लगत पार्किंगमुळे जाण्या येण्यासाठी कुठलीही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

समाजवादी पार्टीच्या पाठपुराव्याने जिल्हाधिकारी यांनी दिले कारवाईचे आदेश   

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर नगर मनमाड हायवेलगत सावेडी बस स्टॉप एसटी महामंडळाच्या जागेवर विनापरवाना साई फन फेअर वर त्वरित कारवाई करून बंद करण्याची मागणी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी अजीम राजे यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन करण्यात आली होती.

अहमदनगर शहरात एसटी महामंडळ जागेवर साई फन फेअर आला आहे. मात्र फन फेअरला कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. सदर फन फेअर आयोजनास खालील प्रमाणे अटी व शर्ती असल्याने जिल्हाधिकारी यांचा ना हरकत प्रमाणपत्र घ्यावा लागतो व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे ना हरकत प्रमाणपत्र व मनपा आरोग्य विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्र व अग्निशमन विभागाचा ना हरकत प्रमाणपत्र व फन फेअर मध्ये सर्व कर्मचारी यांच्याकरिता स्वच्छतागृह व त्याची साफसफाई ठेवण्याची जबाबदारी व फन फेअर च्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी व पार्किंग व्यवस्था स्वतंत्ररीत्या करण्यात यावे व फन फेअर मध्ये लावलेले पाळणे झोके याचे फिटनेस सर्टिफिकेट लागते अशी अटी व शर्ती असतात मात्र या अटी व शर्तीचा कोणताही पालन न करता संपूर्णपणे उल्लंघन केलेला असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी अजीम राजे यांनी केला.

या विनापरवाना फन फेअर वर कारवाईसाठी १६ मे २०२४ रोजी निवेदन देऊन ही कारवाई करण्यात यावी अन्यथा ६ जून २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगितले होते त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे आदेश पत्र देण्यात आलेले आहे.

या अनधिकृत विनापरवाना साई फन फेअर हे नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करण्यात आला असून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles