राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने पूजा वराडे हिचा सत्कार
मुलीचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आई-वडिलांचा प्रोत्साहन महत्त्वाचा -बलभीम कुबडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी रमेश वराडे यांची मुलगी आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करुन पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल तिचा आई-वडिलांसह राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहमदनगर विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी संघटनेचे केंद्रीय सदस्य बलभीम कुबडे, जिल्हा प्रतिनिधी गंगाधर कोतकर, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, खजिनदार विठ्ठल देवकर, सदस्य खोमणे, शिवलेकर, संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक ॲड. साहेबराव चौधरी, हरदिन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष संजय सपकाळ, दत्ता खोमणे, अतुल शिवलेकर आदी उपस्थित होते.
बलभीम कुबडे म्हणाले की, एसटी महामंडळात कार्यरत राहून रमेश वराडे यांनी मुलीला उत्तम खेळाडू म्हणून घडविले. खेळातून तिने आई-वडिलांसह शहराचे नाव मोठे केले. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करुन तिने यश गाठले आहे. मुलीचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आई-वडिलांचा प्रोत्साहन महत्त्वाचा ठरतो. वराडे दांम्पत्यांनी सातत्याने आपल्या मुलीला प्रोत्सान दिले. तिने मिळवलेले यश सर्वच एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी वराडे हिचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- Advertisement -