मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

- Advertisement -

मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन                         

अहमदनगर (प्रतिनिधी)-

शुक्रवार ३ मे ते मंगळवार ७ मे २०२४ पर्यंत अहमदनगरच्या आनंद ऋषी हॉस्पिटल शेजारी, बडी साजन मंगल कार्यालया येथे शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष  नरेंद्र फिरोदिया यांनी दिली. या स्पर्धेत भारतातून खेळाडू बुद्धिबळ खेळण्यासाठी येणार असून आत्तापर्यंत गुजरात, आंध्र प्रदेश, दिव, दमन, गोवा, तमिळनाडू इत्यादी राज्यातून अडीचशेच्या वर खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. इंटर नॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी सहित अनेक दिग्ज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत असे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. साडेपाच वर्षाचा बाळ खेळाडू तसेच ८३ वर्षाचे वयस्कर खेळाडू सुद्धा यात आपले बुद्धीचे बळ पणाला लावणार आहे असे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले.

शुक्रवारी ३ मे रोजी सकाळी ११.३० वाजता ह्या स्पर्धचे उद्घाटन होणार असून. त्यानंतर स्पर्धा सुरू होणार आहे या स्पर्धेत एकूण ९ फेऱ्या होणार आहेत शेवटी मंगळवारी दुपारी ३.०० अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

या स्पर्धेत विविध गटात तीन लाख रुपयांची प्रोत्साहन पर रोख बक्षिसे, आकर्षक ५० करंडक व  सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे प्रमुख पंच प्रवीण ठाकरे (जलगाव) हे असून त्यांना शार्दुल टापसे (सातारा) सहाय्यक पंच म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. ह्या दोघांना ६ सहाय्यक पंच मदत करणार आहेत. ही स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या नियम नियमावली नुसार होणार आहे.

तसेच या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे १०० लाकडी पट व सोंगट्या चा वापर महाराष्ट्रात पहिल्यांदा होणार आहे. अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सदस्य सुबोध ठोंबरे, परूनाथ ढोकळे, शाम कांबळे, देवेंद्र ढोकळे, रोहित आडकर, मनीष जस्वनी, प्रकाश गुजराती, चेतन कड, देवेंद्र वैदय, संजय खडके, नवनीत कोठारी, डॉ स्मिता वाघ आदी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अहमदनगर शहरातील खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वरील स्पर्धेत अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क यशवंत बापट. ९३२६०९२५०१ व पारूनाथ ढोकळे  ९८५०७०४२६८.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles