रयत सेवक को. ऑप. बँकेच्या निवडणुकीत सर्व जागा लढविण्याची घोषणा

- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत सेवक मित्र मंडळ संघटनेची वार्षिक सभा रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात पार पडली. यामध्ये रयत सेवकांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. निवृत्ती वेतन प्रस्ताव, निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी, शिक्षकेतर कर्मचारी प्रमोशन, अर्धवेळ रयत सेवक, रयत सेवक बँक सभासद लाभांश, कमीत कमी व्याजदर, मयत सभासद व त्यांचे जामीनदार याविषयी चर्चा करण्यात आली. तर रयत सेवक को. ऑप. बँकेच्या आगामी निवडणूकीविषयी सविस्तर चर्चा करून, निवडणुकीत सर्वच्या सर्व 17 जागा संघटनेच्या वतीने लढवण्याची घोषणा करण्यात आली.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व कर्मवीर शंकरराव काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सभेची सुरुवात करण्यात आली. शरद यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेप्रसंगी रयत बँकेचे माजी चेअरमन बी.पी. बोलगे, रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग सहाय्यक विभागीय अधिकारी शिवाजीराव तापकीर, रयत सेवक मित्र मंडळ अध्यक्ष नंदकिशोर गायकवाड आदी उपस्थित होते.

प्रारंभी कोरोना जागतिक महामारीमुळे मयत झालेले रयत सेवक मित्र मंडळाचे मार्गदर्शक प्रा. तुकाराम दरेकर, विजयराव निकम तसेच रयत शिक्षण संस्थेतील सेवक व रयत शिक्षण संस्थेशी जोडले गेलेल्या सर्व मयत व्यक्तींना रयत सेवक मित्र मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मेळाव्याचे अध्यक्ष शरद यादव यांनी संघटनेच्या ध्येयधोरणाविषयी मार्गदर्शन केले. तर रयत बँकेचे माजी चेअरमन बी.पी. बोलगे यांनी रयत बँकेसंदर्भात मार्गदर्शन केले. रयत सेवक मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांनी रयत मित्र मंडळ संघटनेने वेळोवेळी केलेल्या मागण्यांमधील प्रामुख्याने बदली, सेवाजेष्ठतेबाबतचा निर्णय, कलाशिक्षक पदवीधर वेतनश्रेणी, पारदर्शी पदोन्नती प्रक्रिया याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व मनेंजिंग कौन्सिल सदस्य व सर्व जनरल बॉडी सदस्य, समन्वय समिती सदस्य, सचिव, सहसचिव (माध्यमिक), सहसचिव (उच्चशिक्षण), सर्व विभागीय अध्यक्ष, सर्व विभागीय अधिकारी, सर्व सहायक विभागीय अधिकारी, संस्थेचे सर्वच पदाधिकारी व अधिकारी या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव संघटनेच्या वतीने मांडून जाहीर अभिनंदन केले.  सर्वानुमते या ठरावास अनुमोदन देण्यात आले. शिवाजीराव तापकीर यांनी संस्थेचे पारदर्शी प्रशासन व गुणवत्ता वाढ याविषयी मार्गदर्शन केले. सेवकांचे जास्तीत जास्त प्रश्‍न सोडवण्यासाठी संघटना व संस्था प्रशासन यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

रयत सेवक मित्र मंडळ उपाध्यक्ष मुख्याध्यापक मच्छिंद्र पिलगर, मुख्याध्यापक खंडू कांबळे, डोळे, मुख्याध्यापक मरभळ  यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यासाठी मित्र मंडळाचे सचिव भीमा लेंभे, कोषाध्यक्ष सुहास भावसार, संघटक दिपक भोये, महिला आघाडी प्रमुख आशालता शिंदे, अनुसया मरभळ, जिल्हाध्यक्ष दिलीप तुपे, सचिव श्याम भोये, मंगेश पालवे, सातारा विभागीय सचिव मंगेश वडेकर, सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र शिर्के, सचिव सोमनाथ बनसोडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष गोरख गायकवाड, सहसचिव हर्षल माळी, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत शिरसाठ, रावसाहेब केंद्रे, जनार्दन खेताडे, अशोक रणखांब, नवनाथ आडे सर्व कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेसाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग कार्यालय अहमदनगर आणि प्राचार्य, राधाबाई काळे महिला महाविद्यालय यांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रयत सेवक मित्र मंडळ अहमदनगर सहसचिव शिवदास सातपुते यांनी केले. आभार विभागीय सचिव तथा मुख्याध्यापक अनुसंगम शिंदे यांनी मानले. कोविड नियमांचे पालन करून सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles