- Advertisement -
राजकारण करताना व्हिडीओ नव्हे, कर्तृत्व दाखवावे लागते-खा.विखे
शेवगाव दि.१५ प्रतिनिधी
राजकारण करायला कर्तृत्व दाखवावे लागते, त्याग करावा लागतो. केवळ व्हिडीओ काढून जनता बरोबर येत नसल्याचा टोला महायुतीचे उमेदवार खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी लगावला.
तालुक्यातील गोठण येथे आयोजित केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा. डॉ सुजय विखे पाटील बोलत होते.आ.मोनिका राजळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात खा.विखे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या कामाची चर्चा लोकांमध्ये जावून करा. कोण काय बोलतो कोणते व्हिडीओ टाकतो यावर राजकारण होत नाही. राजकारण करण्यासाठी कर्तृत्व लागते त्याग लागतो. इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करणारा आहे. तीस चाळीस वर्ष त्याग केला त्यामुळेच जिल्हयातील जनता वर्षानुर्षे साथ आणि पाठबळ देत असल्याचे विखे पाटील म्हणाले.
राज्यात महायुतीचे सरकार दिड वर्षापुर्वी आले. शक्य तेवढा निधी उपलब्ध करून प्रत्येक गावात विकास काम कशी होतील असा प्रयत्न केला. हेच सरकार पाच वर्षासाठी आले असते तर अधिक निधीची उपलब्धता करता आली असती. पण सरकार का आले नाही हे आपण सर्वजण जाणता. आता महायुती आहे. तेवढ्याच गतीने निर्णय होत असून काम मार्गी लागत असल्याचे विखे यांनी सांगितले.
लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडविणारी आहे. देशाला प्रगती पथावर नेतानाच देश सुरक्षित कसा राहीला याचे धोरण ठरविणारी निवडणूक असल्याने निवडणुकीकडे तेव्ढ्याच गांभिर्याने पाहाण्याचे आवाहन करून राजकारण प्रेमाने कमावलेल्या लोकांना बरोबर घेवून करायचे असते.
- Advertisement -