श्रमिकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी ई श्रम कार्डधारकांना केंद्राच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार – अशोक भोसले
अहमदनगर (प्रतिनिधी)- हातावर पोट असलेल्या असंघटित कामगारांसाठी शहरातील रामवाडी भागात भारतीय जनता पार्टी अनुचूचित जाती मोर्चाच्या वतीने ई श्रम कार्डसाठी नोंदणी अभियान राबविण्यात आले. चार ते पाच दिवस शिबीर घेऊन नोंदणी केलेल्या कामगारांना ई श्रम कार्डचे वाटप भाजप अनुचूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे व मध्य मंडळाअध्यक्ष अशोक भोसले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी उप मंडळाध्यक्ष दिलीप जाधव, पोपट भोसले, विनोद दुशिंग, बाळासाहेब पाटोळे, अॅड. किरण भिंगारदिवे, सागर वाकळे पाटील, महेश भोसले, गणेश भोसले, संतोष अडागळे आदी उपस्थित होते.
असंघटित श्रमिक कामगारांना केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई श्रम कार्डची नोंदणी सुरु आहे. रामवाडी भागात मोठ्या प्रमाणात हातावर पोट असलेले असंघटित कामगार वास्तव्यास आहे. या अशिक्षित श्रमिक कामगारांची ई श्रम कार्डची नोंदणी होण्यासाठी भाजप अनुचूचित जाती मोर्चाचे मध्य मंडळाअध्यक्ष अशोक भोसले यांच्या संकल्पनेतून शिबीर घेऊन कामगारांची नोंदणी करण्यात आली होती. नोंदणी करण्यात आलेल्या कामगारांना ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.
अशोक भोसले म्हणाले की, श्रमिकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी ई श्रम कार्डच्या माध्यमातून त्यांना केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. श्रमिक कामगार अशिक्षित असल्याने त्यांना अनेक शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते. त्यांची नोंदणी होण्यासाठी विशेष नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीनंतर देखील हे शिबीर घेऊन असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाना पाटोळे यांनी कामगारांना अनेक योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई श्रम कार्डची नोंदनी आवश्यक आहे. कामगारांच्या हिताचे सरकार सत्तेवर असून, त्यांच्या कल्याणासाठी विविध महत्त्वकांशी योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबीरासाठी लहुजी भक्त मित्र मंडळाच्या युवकांनी परिश्रम घेतले.