आ.रोहित पवारांसह अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनावर भाविक-भक्तांची स्तुतीसुमने
कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
‘राज्यभरातील भाविक-भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या राशीन येथील जगदंबा देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियोजनाची आ.रोहित पवार यांनी पाहणी करत दर्शनबारीने जगदंबेचे दर्शन घेतले.अनेक बैठका घेतल्यानंतर झालेल्या सर्व नियोजनाचा आढावा घेत त्यांनी दर्शनासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
आ. रोहित पवार, प्रांताधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव,पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच उभा राहून परिश्रम घेत असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले जात आहे.
जगदंबा देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातुन जेवढे भाविक येतील त्या सर्वांना व्यवस्थित दर्शन घेता यावे अशा सुचना आ.रोहित पवार यांनी दिल्या होत्या.त्या अनुषंगाने त्यांनी अनेक बैठकाही घेतल्या.प्रशासनाला सांगुन अनेक बैठका झाल्यानंतर आता योग्य नियोजन झाले.
यावर्षी केलेल्या नियोजनावर सर्वच समाधान व्यक्त करत आहेत.कोरोनामुळे बंद असलेली मंदिरे खुली करण्यात आली आणि लाखो भाविकांची रिघ राशीन येथे लागली मात्र उत्कृष्ट नियोजनाने हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेबरोबरच प्रत्येकाला सुलभ दर्शन घेता यावे यासाठी जगदंबा देवी मंदिर परिसरात नियोजित बॅरिकेटिंग करून दर्शनासाठी येण्यासाठी एक व दर्शन करून बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग असे दर्शन बारीचे नियोजन करण्यात आले आहे.
ट्राफिक नियंत्रणासाठी मंदिराच्या दक्षिण व उत्तर गेटच्या ठिकाणी एक रेषा केल्याने सर्व वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांनी दर्शनासाठी मुख्य गाभाऱ्यात जाऊन गर्दी करण्यापेक्षा व कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आत न जाता मंदिराच्या पितळी दरवाजाजवळच भाविक-भक्तांची दर्शनाची सोय केल्याने अगदी कमी वेळेत दर्शनाचा लाभ मिळत आहे,कोणतेही नियोजन नसल्याने दरवर्षी महिलांना असुरक्षित वाटत असते मात्र आता महिला समाधानाने गर्दी न होता दर्शन घेत आहेत.
धक्काबुक्की, चोरी असे प्रकारही बंद झाले. प्रशासनाने मंदिराचे मानकरी व सेवेकरी आदींच्या वेळोवेळी बैठका घेतल्याने मंदिरात आरतीसाठी व इतर विधीसाठी गर्दी न होता मोजकेच भाविक जात आहेत.अनेक भाविकांमुळे मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने मंदिरा समोरील दुकानदारांना पोलीस यंत्रणेने समजावुन सांगत मंदिरासमोरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत.
त्यामुळे या ठिकाणी गर्दी न होता मोठा रस्ता खुला झाल्याने गर्दीला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.राशीन येथील नागरिक, राशीन देवस्थान ट्रस्ट आणि परिसरातील सर्व गावांतील पदाधिकारी ग्रामस्थांनी आदींचे मोठे सहकार्य लाभले आहे.
आता जगदंबेचा दसरा उत्सवही होणारच!
‘गेली नऊ दिवसांच्या कालावधीत राज्यभरातून लाखो भाविकांनी जगदंबेचे दर्शन घेतले.अवघ्या दहा ते पंधरा मिनिटातच भाविक-भक्तांना दर्शन मिळाले.विशेषतः सर्व महिलांनी या नियोजनाचे स्वागत केले.आता यंदाचा दसरा उत्सवही योग्य पद्धतीने होईल.या नियोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व अधिकारी पदाधिकारी, कर्मचाऱ्यांचे मी मनापासुन आभार मानतो – आ.रोहित पवार