- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक्षक अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅस बत्ती व मेणबत्ती पेटवून आंदोलन
शहरात लाईट गुल नागरिक हैराण
शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन – संपत बारस्कर
नगर : शहरात गेले कित्येक दिवसापासून शहर व उपनगरामध्ये नागरीकांना तथा आपल्या ग्राहकांना पुर्व कल्पना न देता वारंवार बीज खंडीत केली जात आहे. गेल्या 15 दिवसामध्ये वीज खंडीत होण्याचे प्रमाण चाढल्याचे दिसून येत आहे. थोड्या प्रमाणात वादळी वारे सुटले की लगेच वीज खंडीत होते. तसेच उन्हाळ्याचे दिवस सुरु असून उष्णेतेची तीव्रता वाढली असून लाईट गुल होण्याचे प्रमाण वाढले असून नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत असून मान्सूत पूर्व तयारी कुठेही दिसून येत नाही. तसेच विद्युत तारांवरील झाडांच्या फांद्या तोडून उचलून घेऊन जाव्यात आणि शहरातील विदूत कार्यालयात नागरिकांचे आलेले फोने उचलावेत तसेच फोन न उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
विधुत विभागाच्या वतीने नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे त्याचा निषेध म्हणून ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक्षक अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅस बत्ती व मेणबत्ती पेटवून आंदोलन करण्यात आले. अन्यथा लवकरच शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशा ईशारा राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक्षक अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅस बत्ती व मेणबत्ती पेटवून आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर,प्रा.माणिकराव विधाते,प्रकाश भागानगरे, अभिजित खोसे,केतन क्षीरसागर, जॉय लोखंडे,सुरेश बनसोडे, साहेबान जहागीरदार,साधना बोरुडे, शैला गिरे, रेणुका पुंड, रूपाली गायकवाड, किरण कटारिया, तुका कोतकर, सोनू घेमुड,माऊली जाधव,मंगेश खताळ,संजय सपकाळ, ऋषिकेश ताठे, पप्पू पाटील,दीपक खेडकर,मळू गाडळकर,अंकुश मोहिते आदि उपस्थित होते.
यावेळी विद्युत विभागाच्या वतीने लेखी आश्वासन देन सांगितले कि पुरवठा सुरळीत राहील याकरीता सर्वतोपरी योग्य ते नियोजन व उपयोजना करण्यात येतील. तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी व तक्रार निवारण केंद्रातील फोन वेळेत घेतले जातील व ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्याबाबत संबंधितांना सुचना करण्यात येतील व फोन न उचलल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच अहिल्यानगर शहर व उपनगरातील संबंधीत उपविभाग कार्यालय व कक्ष कार्यालय येथील तक्रार निवारण केंद्रातील दुरध्वनी क्रमांक देण्यात येतील व यावेळी सावेडी व नालेगाव येथील कक्ष कार्यालयातील फोन न उचलणा-यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल व सर्व लाईनवरील झाडे तोडण्याचे काम करण्यात येऊन ते उचलण्यात येतील. तसेच उघड्या डीपीचे दरवाजे आठ दिवसाचे आंत बंद करण्यात येतील. असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
- Advertisement -