अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेस कार्यालय कालिका प्राईड येथे घेण्यात आलेल्या बैठकित महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या सूचनेनुसार निवड करून निवडीचे पत्र देऊन सत्कार करताना महाराष्ट्र प्रदेशचे सचिव दीप चव्हाण, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष मयूर पाटोळे, इटकचे मा.जिल्हाध्यक्ष अभिजीत लुनिया, हनीफ शेख, योगेश काळे, अमन तिवारी, रोहन पाटोळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे म्हणाले की गणेश भोसले यांच्या सामाजिक उपक्रमाची दखल घेत राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.या नियुक्ती मार्फत कामगारांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करून कामगारांना न्याय देण्याचे सांगून कामगार युनियन च्या माध्यमाने शहरांमध्ये राष्ट्रीय मजदूर काँग्रेसची ताकद वाढवण्याचे कार्य होणार असल्याची भावना व्यक्त केले.
तसेच नूतन इंटकचे शहर जिल्हाध्यक्ष गणेश भोसले म्हणाले की संघटनेची शहरांमध्ये ताकत वाढवण्यासाठी प्रयत्न चालू असून वंचित दुर्बल घटकातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस ही नेहमी प्रयत्नशील आहे.
अनेक सामाजिक विषय हाताळत असताना संघटना वंचितांना आधार बनून कार्य करीत आहे.पुढील वाटचाल जोमाने करणार व कामगारांच्या माध्यमातून संघटना मजबूत करणार असल्याचा निर्धार यावेळी गणेश भोसले यांनी व्यक्त करून निवडीबद्दल त्यांनी आभार मानले या निवडीबद्दल भोसले यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.