नगरसेविका सुवर्णा जाधव यांची ना.गडकरींकडे मागणी
अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर शहरामधून राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ कल्याण-विशाखापट्टम जात असल्याने हा राष्ट्रीय महामार्ग शहरामधून गेल्यामुळे सक्कर चौक, टिळकरोड, नगर-कल्याण रस्त्यावर असणार्या व्यवसायिकांना व्यवसाय करण्यास व बांधकाम परवानगी मिळत नसल्याने शहरातील व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे.हे नियम शिथिल करावेत तसेच या रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने तो तातडीने दुरुस्त करण्यात यावा.
या मागणीचे निवेदन नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितीन गडकरी यांना स्व.खा.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी आले असता दिले.
यावेळी दत्ता जाधव, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे आदि उपस्थित होते.
या निवेदनात पुढे म्हणाले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ व आताचा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ कल्याण-नगर-विशाखापट्टणम या महत्वकांक्षी रस्त्याचे काम सध्या सुरु आहे.नगर शहरातील कल्याण रोड, नेप्ती नका, आयुर्वेद रोड, टिळक रोड, सक्कर चौक या भागातून हा रस्ता जात आहे. हा सर्व भाग माझ्या प्रभागात येत असल्याने या रस्त्यावर असणार्या व्यवसाय करणार्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांचा फटका बसला आहे. राष्ट्रीय महामार्गालगत बांधकाम करणे, व्यवसाय करणे आदिंबाबत विविध अटी व शर्ती लादण्यात आलेल्या आहेत.
त्यामुळे व्यावसायिकांना व्यवसाय करणे अवघड झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय मार्गाच्या नियमात शिथिता आणून व्यवसायिकांना दिलासा द्यावा. त्याचप्रमाणे या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरुरावस्था झाली असून, तो तातडीने तयार व्हावा, अशी विनंती निवेदनाद्वारे ना.गडकरी यांच्याकडे केली आहे.