फिरत्या वाहनाचा जिल्हाधिकारी यांचे हस्ते शुभारंभ
अहमदनगर प्रतिनिधी – स्वामी विवेकानंद यांची जयंती व २५ व्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातंर्गत क्षेत्रीय लोकसंपर्क कार्यालयाच्या आणि राज्यशासनाच्यावतीने कोरोना विषयी जनजागृती व कोविड लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात श्राव्य फिरत्या वाहनाद्वारे जनजागृती अभियानाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
राज्यभर कोरोना विषयी जनजागृती अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा एक भाग म्हणुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहमदनगर, क्षेत्रिय प्रचार अधिकारी, माधव जायभाये, जिल्हा माहिती अधिकारी, डॉ. रवींद्र ठाकुर आदि मान्यवर उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातही दिनांक १२ ते १४ जानेवारी २०२२ दरम्यान राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन राष्ट्रीय युवा महोत्सव, कोरोना आणि स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव आदी विषयावर श्राव्य जनसंपर्क जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
अहमदनगर शहर तसेच ग्रामीण भागांमध्ये राबविण्यात येणा-या या अभियानाच्या माध्यमातून कोरोना विषयीची खबरदारी, देश विकासात युवकांचा सहभाग स्वामी विवेकानंदांचे विचार युवकांपर्यंत पोहचविणे या विषयांवर प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने तयार करण्यात आलेले ऑडीओ संदेशाच्या माध्यमातून फिरत्या वाहनाद्वारे जनतेचे प्रबोधन केले जाईल.