जनतेच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असणार्या पोलिस दलास कोरोना संरक्षणासाठी मास्क व सॅनीटायझरचे वाटप
अहमदनगर प्रतिनिधी – शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ६४ वा स्थापना दिवस आरपीआय (आठवले) पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. जनतेच्या सुरक्षिततेसाठी कोरोना काळात अविरत सेवा देणार्या पोलिस दलास अहमदनगर आरपीआयच्या वतीने कोरोना संक्रमणाच्या सुरक्षिततेसाठी मास्क व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून पोलिस दल नागरिकांसाठी योगदान देत आहे. या कार्यात पोलिस दलातील अनेक कर्मचार्यांनी प्राण देखील गमावले. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय मंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या संकल्पनेतून पोलिस सुरक्षित तर जनता सुरक्षित, या भूमिकेतून हा उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात मास्क व सॅनीटायझरची भेट देण्यात आली. तर चौका-चौकातील वाहतुक नियंत्रणाचे काम करणार्या पोलिसांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, युवक शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक राहुल कांबळे, तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, विजय भांबळ, चंद्रकांत भिंगारदिवे, मंगेश मोकळ, कृपाल भिंगारदिवे, प्रवीण वाघमारे, विवेक भिंगारदिवे, अजय पाखरे, विलास साळवे, संदीप सकट, महेंद्र मोहिते, विशाल कदम, आशिष भिंगारदिवे, आकाश तांबे, योगेश त्रिभुवन, दया गजभिये, निखिल सूर्यवंशी, अरविंद धिवर, प्रतिक नरवडे, अर्जुन शिंदे, गणेश अडागळे, संदेश पाटोळे, अजय आंग्रे, शुभम बडेकर, सागर शिंदे आदिंसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले की, कोरोना काळात पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली. स्वतःच्या परिवाराची काळजी न करता पोलिस बांधव जनतेच्या सेवेसाठी नेहमीच सज्ज राहिले आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान व पाठबळ देण्याच्या भावनेने पक्षाच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित आरपीआय पक्ष कार्यकरत आहे. आरपीआयने नेहमीच पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. कोरोनाकाळात त्यांनी दिलेले योगदान समाज विसरणार नाही. त्यांनी कोरोना योध्दाची भूमिका सक्षमपणे पेळवली असल्याचे सांगितले.
युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, कोरोना काळात पोलिसांनी आपले कर्तव्य बजावल्याने कोरोना संक्रमण टळले. जिल्ह्यातील काही तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमध्ये नागरिकांना पोलिसांनी आधार दिला. संकट कोणतेही असो, सर्वांच्या मदतीला पोलिस धाऊन जातात. राजकारण करताना सामाजिक बांधिलकी ठेऊन देखील आरपीआय आपले योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.