आमदार संग्राम जगताप व सौ.शीतल जगताप यांच्या हस्ते होणार घटस्थापना
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त नागापूर येथील रेणुकामाता देवस्थानच्या वतीने आ.संग्राम जगताप व सौ.शीतल जगताप याच्या हस्ते दि.७ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ च्या मुहूर्ताला घटस्थापना करण्यात येणार आहे.
कोरोणा संसर्ग विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सर्व अटी व शर्तींचे पालन करून करून पारंपारिक पद्धतीने शारदीय नवरात्र उत्सव साजरे केले जाणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष प्रभाकर भोर यांनी दिली आहे.
देवस्थानचे अध्यक्ष भोर पुढे म्हणाले की,हजारो वर्षापूर्वीचे पुरातन प्राचीन काळातील माहूरगड येथील रेणुका मातेचे स्थान नागापूर एमआयडीसी येथे आहे.नागापूर येथील रेणुका माता देवस्थान हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे.या देवस्थान पुरातन काळातील असून या देवस्थानला धार्मिक-अध्यात्मिकता याचा मोठा वारसा आहे.
कोविड संकटकाळा मुळे आयोजित सर्व सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षी होणार नसून नवरात्र उत्सवानिमित्त सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन देवस्थानच्या वतीने घेण्यात येणार आहे.यामध्ये नऊ ऑक्टोंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर,दहा ऑक्टोंबर रोजी सर्वरोग निदान शिबिर,अकरा ऑक्टोंबर रोजी स्त्रीरोग निदान शिबिर,तेरा ऑक्टोंबर रोजी मोतीबिंदू व डोळे तपासणी शिबिर तसेच रात्री होम हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी खजिनदार एकनाथ वाघ,विश्वास साहेबराव भोर,राजू भोर,दत्तात्रय विटेकर,गोरख कतोरे,विष्णू भोर,किरण सप्रे,कचरू भोर,सुखदेव सप्रे आदी देवस्थानचे विश्वस्त यावेळी उपस्थित होते.
कोरोनाच्या अटी व शर्तींच्या नियमाचे पालन करून भाविक भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे.